विधि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार व लसीकरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST2021-06-06T04:23:16+5:302021-06-06T04:23:16+5:30
दरम्यान, जयपूर येथील मणिपाल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डॉ. विजयलक्ष्मी शर्मा यांनी भारतातील महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ विषयी सखोल ...

विधि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार व लसीकरण जनजागृती
दरम्यान, जयपूर येथील मणिपाल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डॉ. विजयलक्ष्मी शर्मा यांनी भारतातील महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ विषयी सखोल मार्गदर्शन केले. लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा लागू होऊन आठ वर्षे झाली, मात्र आजही बहुतांश काम करणाऱ्या महिलांना त्यांना असलेल्या संरक्षणाबद्दल माहिती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कोविड-१९ या महामारीपासून संरक्षण होण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतलेली आहे. मात्र आपल्या या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यात लसीकरणाबद्दल भीती असल्याने महाविद्यालयातर्फे जनजागृती होण्याच्या दृष्टीने कोविड लसीकरणाविषयी जनजागृती प्रश्नावली स्पर्धा ऑनलाइन आयोजित केली होती. ज्यामध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नोत्तराची रचना ही विद्यार्थी आणि समाजात लसीकरणाची जागृती निर्माण व्हावी तसेच त्यांनी इतर नागरिकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करावे या दृष्टीने तयार करण्यात आली होती. हा उपक्रम महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक डॉ. एस.एस. हासानी यांनी प्राचार्य प्रा. डॉ. एन.डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली. संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी व उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र रघुवंशी, सचिव यशवंत पाटील व सर्व संचालक मंडळाने या उपक्रमासाठी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले.