Vidhan Sabha 2019: मतदान यंत्रणांची राजकीय प्रतिनिधींसममोर सरमिसळ प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:05 IST2019-09-27T13:05:43+5:302019-09-27T13:05:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणल्या जाणा:या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड ...

Vidhan Sabha 2019: मतदान यंत्रणांची राजकीय प्रतिनिधींसममोर सरमिसळ प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणल्या जाणा:या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संगणकाद्वारे करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी धर्मेद्र जैन तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यासाठी आलेले बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथम सरमिसळ प्रक्रीया राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संपुर्ण ऑनलाईन प्रक्रीया करण्यात आल्याने यात मानवी हस्तक्षेपास वाव राहणार नसून मतदान यंत्र कोणत्या विधानसभा मतदार संघात जाणार आहे याची माहिती कुणालाही राहणार नाही. विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान यंत्रांची सरमिसळ करुन त्याचा उपयोग करण्यात येणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची दोनस्तरावर सरमिसळ होणार आहे, असे यावेळी भारुड यांनी सांगितले. निकम म्हणाले, जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघासाठी दोन हजार 446 बॅलेट युनिट, 1 हजार 708 कंट्रोल युनीट आणि 1 हजार 773 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व यंत्रांची बंगलोरच्या बीईएल कंपनीच्या अभियंत्यांनी तपासणी केली आहे. यंत्रांची सरमिसळ करुन जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघाच्या स्ट्रॉग रुममध्ये पुन्हा सिल बंद करुन ठेवण्यात येतील. जिल्ह्यात एकूण 1 हजार 385 मतदान केंद्र असून प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान यंत्रे देण्यात येणार असून शिल्लक यंत्रे चारही मतदार संघासाठी राखीव म्हणून ठेवण्यात येतील.