सात हजार हेक्टरवरील पिकांचा उतरवला विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:14 IST2019-07-30T12:14:18+5:302019-07-30T12:14:24+5:30
भूषण रामराजे। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात आतार्पयत केवळ 6 हजार 482 ...

सात हजार हेक्टरवरील पिकांचा उतरवला विमा
भूषण रामराजे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात आतार्पयत केवळ 6 हजार 482 शेतक:यांनी विमा उतरवून घेतला आह़े एकूण 7 हजार 46 हेक्टर क्षेत्रच यातून संरक्षित झाले असून भरपाई मिळत नसल्याने यंदाही जिल्ह्यातील शेतक:यांनी विम्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आह़े
जिल्ह्यात 2017 च्या खरीप हंगामात 12 हजार 635 शेतक:यांनपी पिक विमा करवून घेतला होता़ यासाठी 24 कोटी रुपयांचा विमा हप्ता शासनाकडे जमा करण्यात आला होता़ यातून दुष्काळ जाहिर झाल्यानंतर शेतक:यांना भरपाई मिळणार अशी अपेक्षा असताना 2018 मध्ये केवळ 814 शेतक:यांना भरपाई देण्यात आली़ दरम्यान 2018 या वर्षात 9 हजार 314 कजर्दार तर 917 बिगर कजर्दार शेतक:यांनी पीक विमा करुन घेतला होता़ यातील केवळ दोन हजार शेतक:यांना भरपाई वाटप करण्यात आल्याने यंदा शेतक:यांनी पिक विमा करण्याकडे दुर्लक्ष केले आह़े
2016-17- 39 हजार 259 शेतक:यांनी 26़69 कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ यात केवळ
10.03 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आल़े
2017-18
12 हजार 635 शेतक:यांनी 24़45 कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ
18.00 लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आल़े
2018-19- 10 हजार 231 शेतक:यांनी 2़ 51 कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ केवळ
16.00 लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आल़े
विमा संरक्षण कोणाला?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतक:यांना विमा संरक्षण मिळणार.
24 जुलै ही पीकविमा भरण्याची अंतिम मुदत होती. पण, यासाठी येणा:या तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणा:या त्रुटी आणि बँकानी पीकविमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतक:यांची गर्दी लक्षात घेऊन 29 जुलैर्पयत ही मुदत वाढविण्यात आली.
विमा हप्ता किती?
खरीप हंगामातील पिकांसाठी शेतक:यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के तर नगदी पिकांकरिता 5 टक्के हप्ता शेतक:यांना भरावा लागणार आहे.