जलस्त्रोतांची मोबाईल अॅपद्वारे तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:20 IST2019-10-13T12:19:57+5:302019-10-13T12:20:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साडेआठ हजार सार्वजनिक जलस्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आह़े यासाठी प्रथमच ...

जलस्त्रोतांची मोबाईल अॅपद्वारे तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील साडेआठ हजार सार्वजनिक जलस्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आह़े यासाठी प्रथमच जिओफेंन्सिंग मोबाईल अॅपची मदत घेण्यात येणार असून याद्वारेच तपासणीच्या माहितीचे आदानप्रदान होणार आह़े
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यांतर्गत जिल्ह्यातील 8 हजार 644 जलस्त्रोतांची तपासणी होणार आह़े मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण व पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सव्रेक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आह़े यातून जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध आणि निजरुकीकरण केलेले पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़े दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर जलनमुने तपासणीसाठी पाठवण्याचा कार्यक्रम राबवण्यात येतो़ यांतर्गत यंदा जिओफेन्सिंग मोबाईल अॅपद्वारे ही तपासणी होणार आह़े यासाठी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, जलसुरक्षक, उपविभागीय जल कर्मचारी यांच्यासह विविध कर्मचा:यांना तपासणीसाठी पाठवण्यात येणा:या नमुन्यांची माहिती अॅपद्वारे पाठवायची आह़े 15 ऑक्टोबरपासून या मोहिमेला सुरुवात होणार असून 31 डिसेंबर रोजी अभियानाचा समारोप करण्यात येणार आह़े संकलित केलेल्या जलनमुन्यांची तपासणी अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार आणि नवापुर येथील तालुका प्रयोगशाळेत तर तळोदा व शहाद्याच्या नमुन्यांची तपासणी तळोद्यात होणार आह़े
सुरु होणा:या अभियानासोबतच सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सव्रेक्षण 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे राबवले जात आह़े त्यासाठीचे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तराव स्त्रोतांचा परिसर, जलकुंभाची स्वच्छता, योजनांमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन त्याआधारे जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतींना लाल, पिवळे व हिरवे काडे देण्यात येणार आह़े जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून एकूण 8 हजार 623 जलस्त्रोतांचे नमुने पाठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आह़े