सारंगखेडा बॅरेजची मुख्य अभियंत्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:51 IST2020-09-11T12:51:26+5:302020-09-11T12:51:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदीवरील बॅरेजला यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद जीवने यांनी ...

सारंगखेडा बॅरेजची मुख्य अभियंत्यांकडून पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदीवरील बॅरेजला यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद जीवने यांनी भेट देऊन पाहणी केली.
मुख्य अभियंता जीवने यांनी बॅरेजच्या गेट इलेक्ट्रिक मोटर, त्याचबरोबर दुरुस्ती संदर्भातील यांत्रिकी व विद्युत उपकरणांची पाहणी केली. गेटवरील त्याचबरोबर इतर लोखंडी प्लेटला लागलेला गंज त्यांना आढळून आला. सारंगखेडा बॅरेज दुरुस्तीसंदर्भात शासनाकडे प्राधान्याने पाठपुरावा करून दुरुस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून बॅरेजची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती जीवने यांनी दिली. त्यांनी यांत्रिकी विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकारी अभियंता नितीन खडसे यांच्या विनंतीवरून सारंगखेडा बॅरेजला भेट दिली. त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंता नितीन पोटे, कार्यकारी अभियंता नितीन खडसे, उपअभियंता पंकज कोल्हे, उपअभियंता गोतरणे, शाखा अभियंता स्थापत्य प्रवीण पाटील, शाखा अभियंता स्थापत्य वरूण जाधव आदी उपस्थित होते.