आमलाडच्या विलगीकरण कक्षात ८०० पेक्षा अधिक मजूरांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:41 IST2020-04-29T14:41:39+5:302020-04-29T14:41:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : गुजरात राज्यातून १४ वाहनांमधून परतलेल्या ८०० पेक्षा अधिक मजूरांची आमलाड ता़ तळोदा येथील कोरोना ...

Inspection of more than 800 laborers in Amlad Separation Room | आमलाडच्या विलगीकरण कक्षात ८०० पेक्षा अधिक मजूरांची तपासणी

आमलाडच्या विलगीकरण कक्षात ८०० पेक्षा अधिक मजूरांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : गुजरात राज्यातून १४ वाहनांमधून परतलेल्या ८०० पेक्षा अधिक मजूरांची आमलाड ता़ तळोदा येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणी करण्यात आली़ एकाच वेळी आलेल्या या मजूरांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती़
तोरणमाळ ता़ धडगाव परिसरातील मजूर ऊसतोडीसाठी गुजरात राज्यातील मढी येथे स्थलांतरित झाले होते़ लॉकडाऊनमुळे हाताला काम नसतांना हे मजूर गेल्या महिनाभरापासून त्याठिकाणी अडकून होते.आज अचानक मंगळवारी पहाटेच्या सुमारास निझर, व्यावलमार्गे हे मजूर प्रकाशाजवळील महाराष्ट्र सीमेवर धडकले. यावेळी शहादा तालूका प्रशासनाने त्यांना तालूका हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखले होते़ मजुरांनी तोरणमाळचे माजी सरपंच सीताराम पावरा यांच्याशी संपर्क केला होता़ सीताराम पावरा यांनी त्याठिकाणी पोहचून आमदार राजेश पाडवी यांना संपर्क केला होता़ यानंतर हे मंजूर वाका चार रस्ता, हातोडा मार्गाने आमलाड येथे आणले गेले होते़ याठिकाणी त्यांची स्क्रिनिंग करण्यात येऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली़
तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डॉ़ विशाल चौधरी, आरोग्यसेविका एम़ एस़ वळवी, इरला गवळी, ललिता साळवे, सुनंदा चौरे, डी़डी़ गवळी, सी़जी़बोरसे, मनोज पिंजारी, राहुल माळकर, विकास सुसर, के़वाय़अहिरे, शिवराम भिल, पी.ई माळी,मनोज बारी यांच्या आरोग्य पथकाने या मजुरांची आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणी नंतर हे मजूर आपाआपल्या गावाकडे रवाना करण्यात आले़ तपासणी करण्यात आलेल्या मजूरांच्या हातांवर होमक्वारंटाईनचे मारण्यात आले आहेत़ त्यांना गावी पोहोचल्यावर घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ मजूर पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली़

Web Title: Inspection of more than 800 laborers in Amlad Separation Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.