अवघ्या अर्धा किलोमिटर अंतरावरच काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:08 IST2020-02-09T12:07:31+5:302020-02-09T12:08:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादा : नंदुरबारात बाजारासाठी येणाऱ्या अंजनाबाई या रिक्षात बसल्या आणि अवघ्या दहा मिनिटात गावाजवळच त्यांच्यावर ...

अवघ्या अर्धा किलोमिटर अंतरावरच काळाचा घाला
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादा : नंदुरबारात बाजारासाठी येणाऱ्या अंजनाबाई या रिक्षात बसल्या आणि अवघ्या दहा मिनिटात गावाजवळच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकुल वातावणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकाशाकडून नंदुरबारकडे जाणाºया अॅपेरिक्षावर (क्रमांक एमएच ३९-सी ३९५३) अंजनाबाई आणि इतर प्रवासी बसले. गावापासून अवघ्या अर्धा किलोमिटर अंतरावर येताच समोरून काळरूपाने आलेल्या डंपरने त्यांच्या रिक्षावर झडप घातली. क्षणात होत्याचे नव्हते झाले. अंजनाबाई आणि विखरण येथील प्रवासी श्रावण धना पाटोणे यांना या अघपघातात गंभीर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक आणि इतर प्रवाशांना देखील जबर मार लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सायंकाळी उशीरा अंजनाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातानंतर डंपर तेथेच उभे होते तर रिक्षाचा चक्काचूर झाला होता. तातडीने आरोग्य केंद्रातील कर्मचारी घटनास्थळी धावले. दरम्यान, रेतीच्या डंपरच्या अपघातामध्ये आठ दिवसात दोघांना जीव गमवावा लागला तर १० पेक्षा अधीक जणांना जायबंदी व्हावे लागले आहे.