बोकळझर ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराची चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:49+5:302021-09-04T04:36:49+5:30
नवापूर: तालुक्यातील बोकळझर येथील ग्रामपंचायतीअंतर्गत गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणीचे निवेदन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ...

बोकळझर ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराची चौकशी करावी
नवापूर: तालुक्यातील बोकळझर येथील ग्रामपंचायतीअंतर्गत गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणीचे निवेदन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीमध्ये बोकळझर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा, ग्रामसभा घेतल्या नाहीत. सदस्यांची उपस्थिती पत्रक व इतिवृत्त देखील ठेवले नाही.
१४ व्या व १५ व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीचे गांव आराखड्यानुसार विकासकामे न करता प्राप्त निधी खर्च केल्याचे तसेच हिशेबाचे कोणतेही अभिलेख ठेवलेले नाहीत. तसेच ग्रामविकास प्राप्त निधी खर्च न करता रक्कम खर्ची टाकण्यात आली आहे.
दुहेरी हातपंपाची कोणतेही काम न करता निधी खर्च केल्याचे दाखविले आहे.
ग्रामपंचायतीला पेसा कायद्यांतर्गत, ठक्करबाप्पा योजनेंतर्गत, घरपट्टी, नळपट्टी आदींबाबत मिळोलेला निधी विकासकामंसाठी खर्च न करता खर्ची टाकलेला आहे.
स्मार्ट व्हिलेज पुरस्काराची मिळालेली रक्कम देखील खर्च न करता खर्ची दाखविण्यात आली.
सदर ग्रामपंचायतीचे सर्व बँक खात्यांची व आर्थिक व्यवहाराची सविस्तर तपासणी करण्यात यावी व संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.