शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

तपास यंत्रणांकडून निरपराध हिंदू तरूण लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:12 IST

हिंदू राष्ट्र जागृती सभा : सनातनचे अभय वर्तक यांचा सभेत आरोप, विविध वक्त्यांचे मार्गदर्शन

नंदुरबार : पुरोगामींच्या दबावाखाली तपास यंत्रणा निरपराध हिंदू तरुणांना  लक्ष करीत असल्याचा आरोप सनातन संस्थेचे डॉ.अभय वर्तक यांनी येथे आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत बोलतांना केला.हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभा रविवारी कचेरी मैदानावर झाली.  सभेला सनातन संस्थेचे अभय वर्तक, लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले. नंदुरबार आणि आजूबाजूच्या खेडय़ातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बोलतांना अभय वर्तक म्हणाले, निरपराध हिंदू तरुणांना लक्ष्य केले जात आहे. या पुरोगामी वैचारीक आतंकवादाला सनातन संस्था हाणून पाडेल आणि हिंदु राष्ट्र स्थापन करेल. नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणात हेतुपुरस्सरपणे सनातन संस्थेचे नाव गोवले जात आहे. पुरोगामी शक्ती बेकायदेशीरपणे त्यासाठी दबाव आणत आहेत. कोणत्याही न्यायालयाचा निकाल येण्याअगोदरच बंदी आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून दहशतवादविरोधी पथक खोटी विधाने असलेली प्रसिद्धीपत्रके सातत्याने प्रसिद्ध करत आहे. या सर्व त्रासांविरोधात सनातन संस्थेचा लढा सनदशीर मागार्ने चालूच राहील, असे परखड मत अभय वर्तक यांनी व्यक्त केले.खंडलेवाल यांनी सांगितले, भारतातील राज्यकत्र्यांवर दुष्ट प्रवृत्तीचा प्रभाव वाढलेला असल्याने वर्तमान स्थितीत राष्ट्रभक्त घडवणा:या योजनांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय चिंतन थांबले आहे. हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि सुराज्य अभियान या विषयावर बोलताना जुवेकर म्हणाले, शासकीय कार्यालयांत जर देवतांच्या प्रतिमा चालत नाहीत मात्र निधमीर्वाद राबवणा:या शासनाला त्याच हिंदू देवतांच्या मंदिरांचा निधी सरकारला कसा चालतो ? हा कोणता निधमीर्वाद आहे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सभेला श्रेयस पिसोळकर यांनी केलेल्या शंखनादाने प्रारंभ झाला. त्यानंतर सनातनचे  नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्ती योगेश गव्हाले यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कायार्चा आढावा डॉ. नरेंद्र पाटील यांनी मांडला. सूत्रसंचालन रागेश्री देशपांडे यांनी केले.राष्ट्र जागृती सभेसाठी गेल्या महिनाभरापासून जागृती केली जात होती. त्यासाठी विविध गावे, शहरातील विविध प्रभागांमध्ये बैठका घेतल्या जात होत्या. त्यामुळे सभेला मोठी गर्दी झाली होती. शहरातील विविध भागातून युवकांचे जत्थे येत होते. भगवे ङोंडे व विविध घोषणा देत युवक सभास्थळी येत होते. येथेही युवकांचा जोश मोठय़ा प्रमाणावर दिसून आला.