55 ग्रामपंचायतींची माहिती अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:59 IST2019-11-03T12:59:34+5:302019-11-03T12:59:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने मागणी केलेल्या सरपंच व ग्रामसेवकांची माहिती देण्याच्या उपक्रमात नंदुरबार जिल्ह्यातून केवळ ...

55 ग्रामपंचायतींची माहिती अपूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने मागणी केलेल्या सरपंच व ग्रामसेवकांची माहिती देण्याच्या उपक्रमात नंदुरबार जिल्ह्यातून केवळ 540 ग्रामपंचायतींची माहिती सादर होऊ शकली आह़े 55 ग्रामपंचायतींचा माहिती भरलेली नसल्याने आयोगाने ती तात्त्काळ देण्याचे प्रशासनाला सूचित केले आह़े
आयोगाने सरपंच, ग्रामसेवक यांच्या माहितीसह प्रारुप मतदार याद्या, ग्रामपंचायतींची मुदत, संख्या आदींची माहिती मागवली होती़ यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिट्स पुरवण्यात आले होत़े यात जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग झालेल्या या कार्यक्रमात आतार्पयत 595 पैकी केवळ 540 ग्रामपंचायतींची माहिती दिल्याने आयोगाने तातडीने माहिती देण्याचे कळवले आह़े जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतींमध्ये येत्या काळात पोट निवडणूक कार्यक्रम लागू करण्यात येत आह़े यात अनेक ठिकाणी रिक्त पदे तर काही ठिकाणी गेल्या पाच वर्षात नामनिर्देशन दाखल होऊ शकलेले नाही़ यामुळे या जागा भरल्या जाव्यात यासाठी पोटनिवडणूक कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आली आह़े
दरम्यान शनिवारी प्रशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रारुप मतदार याद्या प्रकाशित केल्या आहेत़ या याद्या त्या-त्या तालुका मुख्यालयासह जि़प, पं़स आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे लावण्यात आल्या आहेत़ या याद्यांचे अवलोकन करण्यासाठी अनेकांनी तालुका मुख्यालयी धाव घेतली होती़ याद्यांवर हरकती घेण्यासाठी 6 नोव्हेंबर्पयत मुदत असल्याने याद्या तपासणी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असल्याचे दिसून आल़े