मातांना आरोग्य केंद्रातील आरोग्यविषयक सेवांची माहिती द्या : मनीषा खत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST2021-07-27T04:31:51+5:302021-07-27T04:31:51+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) योजना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस ...

मातांना आरोग्य केंद्रातील आरोग्यविषयक सेवांची माहिती द्या : मनीषा खत्री
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) योजना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. नारायण बावा, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते आदी उपस्थित होते.
खत्री म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य सुविधेस भेट देणाऱ्या सर्व महिला व बालकांना सुमन कार्यक्रमांतर्गत आवश्यक सुविधा देण्याबाबत नियोजन करावे. मातांना नऊ प्रकारच्या आश्वासित सेवांची माहिती बैठकीच्या माध्यमातून द्यावी. सर्व प्रकारच्या सुविधा असलेल्या ठिकाणी कार्यक्रमांची अंमलबजावणी त्वरित करावी. इतरही ठिकाणी कार्यक्रम राबविण्यासाठी अंगणवाडी सेविकेपर्यंत सर्व संबंधित घटकांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील लाभार्थी मातांना तिन्ही टप्प्यातील अनुदान वेळेत मिळेल यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. कागदपत्रातील त्रुटी दूर करून लाभ न मिळालेल्या मातांना योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस आरोग्य, नगरपालिका, डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.