नवापुर तालुक्यात मुंबईमार्गाने कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:12 IST2020-06-03T12:09:21+5:302020-06-03T12:12:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार /विसरवाडी : शहादा व नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील प्रत्येकी एकास कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट सोमवारी ...

Infiltration of Corona via Mumbai in Navapur taluka | नवापुर तालुक्यात मुंबईमार्गाने कोरोनाचा शिरकाव

नवापुर तालुक्यात मुंबईमार्गाने कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार /विसरवाडी : शहादा व नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील प्रत्येकी एकास कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट सोमवारी रात्री प्राप्त झाला होता़ या रिपोर्टमुळे कोरोनामुक्त नवापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून विसरवाडी व परिसरातील दोन गावे सील करण्यात आली आहेत़ दरम्यान शहाद्यात आढळलेला रुग्ण हा प्रभाग क्रमांक सातमधील रझा मशिद परिसरातील रहिवासी आहे़
सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात विसरवाडी येथील ४८ वर्षीय आणि शहादा येथील ४१ वर्षीय पुरुष असे दोघेही पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती़ दोघेही जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरु होता़ यातून विसरवाडी, गडदानी आणि माचोहोंडा ता़ नवापुर येथील तब्बल ३१ जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ या सर्वांना नवापुर येथील क्वारंटाईन कक्षात रवाना करण्यात आले़ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी दाखल झाले होते़
मंगळवारी विसरवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, तहसीलदार सुनिता जºहाड, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ हरीश्चंद्र कोकणी, विस्तार अधिकारी दिलीप कुवर यांनी भेट देत माहिती घेतली़

नवापुरच्या अधिकाऱ्यांचा जंगलात झाला मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील ४८ वर्षीय व्यक्तीचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन कामाला लागले होते़ या व्यक्तीचे मूळगाव असलेल्या गडदाणीपर्यंत जाण्यासाठी रात्री रस्ता न मिळाल्याने अधिकारी, आरोग्य विभागाचे पथक रात्रभर जंगलात मुक्कामी होते़
मुंबई येथून गडदाणी ता़ नवापूर येथे आलेल्या संबधित व्यक्तीने खाजगी रुग्णालयात भेट दिली होती़ यावेळी त्याने रुग्णालयात शेतकरी असल्याचे सांगून माहिती लपवली होती़ दरम्यान विसरवाडी येथे बाजार करत येथील एका सलूनमध्ये दाढी-कटिंग केली होती़ कोरोनाबाधिताचे गडदाणी येथे घर बांधले जात असल्याने विसरवाडी येथे बांधकाम मटेरीयल खरेदी केले होते़मुंबई येथून परतलेल्या या व्यक्तीचा तालुक्यातील माचाहोंडा, गडदाणी आणि सासरवाडी असलेल्या बोरपाडा या गावाशी संपर्क आला आहे़
या पार्श्वभूमीवर रात्रीच आरोग्य यंत्रणेच्या पथक माचाहोंडा येथे दाखल होवून संपर्कांना क्वारंटाईन केले होते़ त्यानंतर हे पथक गडदाणी येथे निघाले होते़ मात्र दोन किलोमीटर अंतरावर कच्चा रस्ता असल्याने पथकाला तेथेच थांबावे लागले़ शेजारील गावातून एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह गडदाणी येथे पाठवून त्यातून संपर्कात आलेल्यांना आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती़ हे सर्व पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु असल्याने अधिकारी व वैद्यकीय पथक हे जंगलातच तळ ठोकून होते़ सर्वांना नवापुर येथे रवाना केल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नवापुरकडे रवाना झाले होते़

रेल्वेस्थानकाला लागुन असलेल्या गुजरातच्या उच्छल हनुमानफळीतील २४ वर्षीय कोरोना पॉझीटीव्ह महिलेस मंगळवारी गुजरातमधील तापी जिल्हा सामान्य रुग्णालयाने डिस्चार्ज दिला आहे़ महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे़ ही महिला १८ मे रोजी अहमदाबाद येथून परतल्यावर होम क्वॉरंटाईन झाली होती. २२ मे रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला व्यारा येथील येथे दाखल करण्यात आले होते. शहर सीमेला लागून असलेल्या भागातून कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन नवापूर शहर हद्दीतील सर्व भाग सील करण्यात आला होता.

Web Title: Infiltration of Corona via Mumbai in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.