यात्रेनिमित्त संसरोपयोगी साहित्य एका छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:35 PM2019-12-15T12:35:02+5:302019-12-15T12:35:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या सारंगखेडा यात्रेत ठिकठिकाणाहून भाविक येत असल्याने ही यात्रा सर्वच व्यापाऱ्यांना चांगले उत्पन्न ...

 Infectious material for travel under one roof | यात्रेनिमित्त संसरोपयोगी साहित्य एका छताखाली

यात्रेनिमित्त संसरोपयोगी साहित्य एका छताखाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या सारंगखेडा यात्रेत ठिकठिकाणाहून भाविक येत असल्याने ही यात्रा सर्वच व्यापाऱ्यांना चांगले उत्पन्न देणारी ठरते. त्यात संसारोपयोगी साहत्यांची मोठी खरेदी-विक्री होत असून विविध प्रकारची भांडे विक्रेते दाखल झाले आहे. त्यामुळे सर्व संसारोपयोगी साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे.
सारंगखेडा यात्रेला चार दिवस झाले असून तेथे उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढत आहे. ही यात्रा केवळ दोन-चार दिवसाची नसून महिनाभर चालणारी यात्रा आहे. यात्रेसाठी केवळ महाराष्टÑातूनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक आले आहेत. महिनाभराच्या कालावधीत या यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे विविध वस्तु, साहित्य विक्रीसाठी व्यापारी दाखल झाले आहे. त्यात संसारोपयोगी साहित्य व मनोरंजानाच्या वस्तुंचा अधिक समावेश असल्याचे दिसून येत आहे.

आधुनिकतेतही जातं वरवंटा शाबूत
आधुनिकतेत नवनवीन संसारोपयोगी साहित्य निर्माण झाले असले तरी समाजाच्या काही घटकांकडून जातं, वरवंटा उखळ या पारंपरिक साधनांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सारंगखेडा यात्रेत म्हसावद ता.पारोळा (जि.जळगाव) येथील महादू बारकू शिराळे हा व्यापारी त्यांच्या कुटुंबियांसह साहित्य विक्रीसाठी आला आहे.

Web Title:  Infectious material for travel under one roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.