पोल्ट्री उद्योगावर गैरसमजांमुळे संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:19 IST2020-03-16T12:18:54+5:302020-03-16T12:19:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोशल मिडियातून कोंबडी आणि मासे खाल्ल्याने कोरोनाचा होत असल्याची अफवा सातत्याने प्रसारित होत असल्याने ...

Infected by misconceptions on the poultry industry | पोल्ट्री उद्योगावर गैरसमजांमुळे संक्रांत

पोल्ट्री उद्योगावर गैरसमजांमुळे संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोशल मिडियातून कोंबडी आणि मासे खाल्ल्याने कोरोनाचा होत असल्याची अफवा सातत्याने प्रसारित होत असल्याने पोल्ट्री उद्योग संकटात सापडला आहे़ परंतू हा निव्वळ गैरसमज असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला असून त्यांच्याकडूनही जनजागृती सुरु झाली आहे़
नवापुर शहर व परिसरात २४ नोंदणीकृत पोल्टी उद्योग आहेत़ यातील बहुतांश पोल्ट्री ह्या अंडी उत्पादन करुन त्याची विक्री करतात़ नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात १०० च्या जवळपास पोल्ट्री आणि हॅचरीज आहेत़ या सर्वच ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने गेल्या आठवड्यात तपासणी केली होती़ २०१९ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ९० हजार १९० कोंबड्या आहेत़ या सर्व कोंबड्या सुस्थितीत असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे़ पशुसंवर्धन विभागाने परवाने दिल्यानंतर सुरु झालेल्या पोल्ट्री उद्योगातून बेरोजगार युवकांना मोठा रोजगार मिळाला आहे़ दिवसातून जिल्ह्यात १० हजारपेक्षा अधिक पक्ष्यांची विक्री होत असल्याने उद्योग तेजीत आहे़ परंतू गेल्या महिन्यापासून कोरोना विषाणू कोंबडी खाल्ल्याने शरीरात जाणार असे संदेश सोशल मिडियातून सुरु झाले होते़ यातून या व्यवसायावर संक्रांत आल्याचे चित्र सध्या बाजारात आहे़ परंतू चिकन खाल्ल्याने कोणासही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले नसल्याने सोशल मिडियातून फिरणारे संदेश हे खोटे असल्याने विभागाने कळवले आहे़
शनिवार आणि रविवारी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांनी पोल्ट्री व्यावसायिकांच्या भेटी घेत तपासणी केली होती़ परंतू आक्षेपार्ह असे काहीही आढळून आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे़ सर्वच कोंबड्या सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले असून स्वच्छता राखण्याच्या सूचना व्यावसायिकांना करण्यात आल्या आहेत़

याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता, त्यांनी सांगितले की, कोंबडी ही संपूर्णपणे शिजवून खाण्याची पद्धत आपल्याकडे रुढ आहे़ यामुळे कोंबडीचे मटन हे संपूर्णपणे सुरक्षित आहे़ सोबत मासे खाल्ल्याने कोरोनाची लागण होतो हे अफवा आहे़ नागरिकांनी सोशल मिडियातून येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये़ दरम्यान पोल्ट्री व्यावसायिकांच्या तपासणी कार्यक्रम पुढील आठवड्यातही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ तालुकास्तरावर पशुवैद्यकीय अधिकारी वेळोवेळी पोल्ट्री व्यावसायिकांसोबत संपर्क करुन माहिती देणार आहेत़

Web Title: Infected by misconceptions on the poultry industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.