मयत अर्भक टाकून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:19 IST2019-11-04T13:19:45+5:302019-11-04T13:19:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील मेमन कॉलनीत मयत पुरुष जातीचे अर्भक टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची ...

The infant escapes in the meantime | मयत अर्भक टाकून पलायन

मयत अर्भक टाकून पलायन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील मेमन कॉलनीत मयत पुरुष जातीचे अर्भक टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आह़े शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दिसून आलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती़ 
शहाद्यातील गरीब नवाज कॉलनी परिसरातील मेमन कॉलनीत बागवान जमात खानाजवळील झुडूपालगतच्या मोकळ्या जागेत नवजात अर्भक पडून असल्याचे त्या भागात खेळणा:या लहान बालकांना दिसून आले होत़े त्यांनी ही माहिती समोरील टेलरींग व्यावसायिक अजहर खान यांना दिली होती़ त्यांनी येथे पाहिले असते पुरुष जातीचे मयत अर्भक पडून असल्याचे दिसून आल़े शहादा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीसांनी भेट देत पंचनामा करुन जागेची पाहणी केली होती़ केवळ विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे अर्भक याठिकाणी फेकून दिल्याचा पोलीसांचा अंदाज आह़े अर्भकाची म्हसावद येथे उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े प्रकरणी अजझहर खान अजीजखान रा़ बिलाल मशीदजवळ शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत़ 
घटनेमुळे या भागासह शहरात एकच चर्चा सुरु होती़ भर दुपारी मोकळ्या जागेत टाकले गेले होत़े या भागात कुत्र्यांच्या झुंडी फिरत असल्याने एखाद्याच्या घरातून कुत्र्याने उचलून आणले असा अंदाज व्यक्त होत होता़ परंतू तशी तक्रार नसल्याने ही शक्यताही मावळली आह़े 
 

Web Title: The infant escapes in the meantime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.