जिल्ह्यातील उद्योगांचे उत्पादन झाले अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:31 IST2020-08-26T12:31:00+5:302020-08-26T12:31:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जून महिन्यापासून जिल्ह्यात लघु आणि मोठ्या उद्योगांची गाडी वेगात दीड हजार लघु आणि मोठे ...

जिल्ह्यातील उद्योगांचे उत्पादन झाले अनलॉक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जून महिन्यापासून जिल्ह्यात लघु आणि मोठ्या उद्योगांची गाडी वेगात दीड हजार लघु आणि मोठे उद्योग पूर्ण क्षमतेने उत्पादन करु लागल्याने मजूरांचा रोजगार पूर्ववत होण्यास मदत मिळत आहे़
लॉकडाऊनमुळे लघु आणि मोठ्या उद्योग मार्च ते मे या काळात बंद होते़ जून महिन्यात काही प्रमाणात ४० टक्के कामगारांसह उद्योग सुरू करण्याची परवानगी होती़ परंतु वाहतूकीवर निर्बंध असल्याने अडचणी कायम होत्या़ मात्र गेल्या अडीच महिन्यात उद्योगांना सावरणाऱ्या सुविधा पूर्ववत झाल्याने परंतू नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊनच्या चारच्या शेवटच्या टप्प्यात सुरु झालेल्या बाजारपेठा या उद्योगांना संजीवनी देणाºया ठरल्या आहेत़ यामुळे हळहळू हे उद्योग निर्मिती प्रक्रियेत वेग पकडत आहेत़ परिणामी त्यांच्याकडे काम करणारे मजूर परतू लागल्याने त्यांच्या हातून गेलेले काम पुन्हा परत मिळाले आहे़ जिल्ह्यात मिरची प्रक्रिया हा प्रमुख उद्योग असून पॅकिंगसह त्याची वाहतूक करण्यासही सुरूवात झाल्याने उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते एप्रिल महिन्यात गावी परत गेलेले बरचसे मजूर परत आल्याने उद्योगांनाही चालना मिळत आहे़
४जिल्ह्यात ९ मोठे आणि १ हजार ४४६ लघु उद्योग आहेत़ मोठ्या उद्योगांमध्ये प्रामुख्याने आॅईल मिलचा समावेश या मिल गेल्या अडीच महिन्यांपासून वेगात सुरू असल्याचे दिसून आले़ मिलमध्ये सोयाबीनची आवक होत असल्याने ते काढणीची प्रक्रिया वेगात सुरू आहे़
४सोबत जिल्ह्यात मिरची प्रक्रिया, मसाले, इंजिनियअरींग, कृषी पूरक उद्योग, दुग्धत्पोदन हे उद्योगही पूर्ववत सुरू झाले आहेत़ लॉकडाऊन सुरू झत्तल्यानंतर नवापुरातील वस्त्रोद्योग, नंदुरबारातील मसाले व मिरची उद्योग पूर्णपणे बंद पडले होते़ उत्पादन तयार करण्यासाठी कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक करण्यासाठी साधने नसल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते़परंतु तूर्तास कच्चा माल येऊ लागला असून तयार मालाची वाहतूक सुरू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी परराज्यातून येणारा कच्च्या मालाची वाहतूक करण्यास संमती दिल्याने उद्योगांना गती मिळण्यास मदत मिळाली आहे़ दरम्यान जिल्ह्यातील कारखानदारांनी मजूरांना कारखान्यापर्यंत जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थेसह इतर सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याने त्यांच्याही अडचणी दूर झाल्या आहेत़
जिल्ह्यात मिरची प्रक्रिया उद्योगानंतर सर्वाधिक उलाढाल ही कोल्डस्टोरजच्या माध्यमातूनही होते़ धान्य, भाजीपाला, फळे, दूध यासह विविध नाशवंत पदार्थांना सामावून घेणाऱ्या कोल्डस्टोरेजमध्ये नियमित कामांना जाणारे हमाल आणि इतर कामगार यांना रोजगार मिळत आहे़ शहादा आणि नंदुरबार येथील १० कोल्डस्टोरेज अडीच महिन्यांपासून व्यवस्थित सुरू असून त्यांच्या व्यवसायात वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
सोबत परप्रांतीय कामगारांच्या भरवशावर चालणारे इंजिअिरींग, बांधकामासाठी लागणाºया फरशीची कटाई, लाकूड कटाई आणि फर्निचर तयार करण्याचे उद्योगही सुरू झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे़
व्यापार उद्योग सुरळीत सुरु झाला आहे़ वाहतूकीला काही अंशी अडचणी येत आहेत़ परंतु त्या सोडवण्यावर उद्योजक भर देत आहेत़ पावसाळा असल्याने व्यवसाय नेहमीप्रमाणे संथ आहे़ परंतु येत्या महिन्यात मिरची उद्योग पुन्हा वेगात सुरू होईल़ स्थानिक मजूर येऊ लागले आहेत़
-शाम बांगड,
मिरची प्रक्रिया उद्योजक, नंदुरबाऱ