अनुदान देण्यासाठी स्वंतत्र मार्केटचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:20 IST2019-07-25T12:20:35+5:302019-07-25T12:20:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक:यांना कांदा अनुदान मिळवून देण्यासाठी नंदुरबार बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती ...

Independent market option for grant | अनुदान देण्यासाठी स्वंतत्र मार्केटचा पर्याय

अनुदान देण्यासाठी स्वंतत्र मार्केटचा पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक:यांना कांदा अनुदान मिळवून देण्यासाठी नंदुरबार बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्र मार्केट सुरु करण्याची तयारी करत आह़े परंतू या बाजारात कांदा खरेदीदार येण्यासाठी अद्यानही उत्सुक नसल्याने समितीचा हा निर्णय अधांतरीच आह़े  
राज्यशासनाने कांदा उत्पादक शेतक:यांना प्रती क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहिर केला आह़े यानुसार त्या-त्या बाजार समित्यांमध्ये कामकाज सुरु झाले आह़े परंतू नंदुरबार जिल्ह्यातील एकाही बाजार समितीत कांदा अनुदान मिळत नसल्याने येथील कांदा उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत़ नंदुरबारसह इतर बाजार समितीत कांदा खरेदी करणारे परवानाधारक व्यापारी नसल्याने ही स्थिती आह़े यावर पर्याय म्हणून नंदुरबार बाजार समितीने गेल्या सहा महिन्यापासून कांदा व्यापा:यांचा शोध सुरु केला होता़ या व्यापा:यांना पळाशी ता़ नंदुरबार येथील बाजार समितीच्या खरेदी केंद्रात जागा देण्याची तयारी दर्शवली होती़ परंतू व्यापा:यांनी उत्सुकता दर्शवलेली नाही़ यामुळे बाजार समितीने स्थानिक बाजार समितीत भाजीपाला उत्पादनात कांदा खरेदी करणा:या आडतदारांनाच कांदा खरेदी परवाने घेण्याची गळ घातली आह़े यासाठी काहींनी उत्सुकता दर्शवली असली तरी अद्याप कांदा बाजारात मंदी सुरु असल्याने तूर्तास त्यांच्याकडूनही निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 
नंदुरबार बाजार समितीत मंगळवारी साधारण 30 क्विंटल आवक झाल्याची माहिती आह़े या कांद्याला 5 ते 11 रुपये प्रती किलो दर देण्यात आला होता़ कांदा दर काहीअंशी वाढले असले तरी आवक नसल्याने व्यापारी बाजार समितीला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आह़े 

नंदुरबार परिसरात काही खाजगी खरेदीदारांकडून कांदा घेतला जात आह़े याचाही बाजारातील आवकवर परिणाम झाला आह़े बाजार समितीने मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील कांदा खरेदीदारांना पाचारण करण्याचा प्रयत्न केला होता़ परंतू त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही़ 
 

Web Title: Independent market option for grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.