हवामानाच्या माहितीसाठी कृषी विभागातर्फे स्वतंत्र अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:10 IST2020-06-28T12:10:46+5:302020-06-28T12:10:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सध्या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना हवामानाची बिनचूक माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ‘मेघदूत’ अ‍ॅप ...

Independent app by the Department of Agriculture for weather information | हवामानाच्या माहितीसाठी कृषी विभागातर्फे स्वतंत्र अ‍ॅप

हवामानाच्या माहितीसाठी कृषी विभागातर्फे स्वतंत्र अ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सध्या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना हवामानाची बिनचूक माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ‘मेघदूत’ अ‍ॅप विकसीत केले आहे. या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना नियमित पाऊस, वादळ, तापमान यासह हवामानाची माहिती मिळणार असून, योग्य सल्लाही देण्यात येणार आहे.
या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकºयांना घरबसल्या आवश्यक ती माहिती मोफत मिळणार आहे. मेघदूत अ‍ॅपचा वापर करीत शेतकºयांना पिकांचे योग्य नियोजन करीत हवामानामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी मेघदूत अ‍ॅपचा वापर करणे अपेक्षित आहे.
गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलामुये दरवर्षी शेतकरी बांधवांचे नुकसानीचे प्रमाण वाढतच चालले आहे. या बदलांमुळे शेतकºयांच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन आर्थिक झळ सोसावी लागत आहे. हवामानातील बदलांविषयी शेतकºयांना त्वरित माहिती मिळावी व त्यानुसार शेतकºयांना त्यांच्या पिकांचे निायेजन करता यावे यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्था पुणे यांच्यातर्फे शेतकरºयांच्या मदतीसाठी मेघदूत अ‍ॅप विकसीत करण्यात आले आहे.
मेघदूत अ‍ॅपच्या माध्यमातून देशातील तसेच महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यातील मागील १० दिवसांचे हवामान पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज, त्याचबरोबर कृषी व पशू सल्ला मोफत उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकºयांना हवामानाचा अंदाज पाहून पिकाचे नियोजन करता येते. पिकाला पाणी देणे, फवारणी करणे, खते देणे, आंतरमशागतीची कामे करणे सोयीचे होते.

हे अ‍ॅप शेतकºयांसाठी फार उपयोगी असून, त्याच्या सहाय्याने शेतकरी जिल्ह्याच्या पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज, तापमान, आर्द्रता, वाºयाचा वेग, वाºयाची दिशा, पाऊस आदींबाबत माहिती मिळू शकतो. या अ‍ॅपवर शेतकºयांना पीकनिहाय व पशुंबाबतदेखील सल्ला मिळू शकतो. विशेष करून शेतकºयांना ही सर्व माहिती मातृभाषेत म्हणजेच मराठीत मिळण्याची सोय आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी या अ‍ॅपला ग्रामीण कृषी मोसम सेवा- कृषी हवामान केंद्राकडून माहिती पुरविली जात आहे.

नंदुरबार येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा-कृषी हवामान केंद्रामार्फत मेघदूत अ‍ॅपबाबत शेतकºयांमध्ये जनजागृती केली जात आहे. शेतकºयांसाठी हे अ‍ॅप फारच फायदेशीर आहे. -सचिन फड,
कृषी हवामान तज्ज्ञ, नंदुरबार

Web Title: Independent app by the Department of Agriculture for weather information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.