मिशन हायस्कूलमध्ये ऑनलाइन पद्धतीने स्वातंत्र्यदिन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:11+5:302021-08-17T04:36:11+5:30
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशप्रेमावर आधारित विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पार पडलेल्या विविध स्पर्धेतून विजेत्या विद्यार्थ्यांंची निवड करण्यात आली. ...

मिशन हायस्कूलमध्ये ऑनलाइन पद्धतीने स्वातंत्र्यदिन कार्यक्रम
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशप्रेमावर आधारित विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पार पडलेल्या विविध स्पर्धेतून विजेत्या विद्यार्थ्यांंची निवड करण्यात आली. यात सर्वोत्कृष्ट कविता लेखन स्पर्धेत तनिष्का पेंढारकर हिला प्रथम, रूचिका विश्वकर्मा द्वितीय तर प्रांजल आंबेडकर यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. या विद्यार्थिनींनी कविता वाचन केले. सर्वोत्कृष्ट निबंध लेखनात जानकी पाठक प्रथम, संजना नानकानी द्वितीय, ओम गोसावी तृतीय यांना तर वक्तृत्व स्पर्धेत प्रतीक वसावे प्रथम, युग पवार द्वितीय तर वेरोनिका पंजाबी हिला तृतीय पारितोषिक देण्यात आले.
यावेळी दहावीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. शिक्षक विशाल पाडवी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका डॉ. सुनिता अहिरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गाैरव केला. कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष रेव्ह. जे. एच. पठारे, कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, संस्थेचे विश्वस्त नूतनवर्षा वळवी, पर्यवेक्षक सॅबस्टीन जयकर उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप शुक्ला यांनी तर आभार फरहाना शेख यांनी मानले.