देखभाल दुरुस्तीचा वाढतोय खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:41 PM2018-12-14T12:41:41+5:302018-12-14T12:42:26+5:30

शहादा चालक प्रशिक्षण केंद्र : तिन सुरक्षारंक्षकांची नेमणूक, उद्घाटनाची प्रतीक्षा

Increasing costs of maintenance | देखभाल दुरुस्तीचा वाढतोय खर्च

देखभाल दुरुस्तीचा वाढतोय खर्च

Next

नंदुरबार : शहादा येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून उभारण्यात आलेल्या चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाअभावी देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत आह़े गेल्या वर्षभरापासून े प्रशिक्षण केंद्राचे काम पूर्ण झाले असले  तरी केवळ परिवहन मंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन रखडले आह़े
राज्यातील निवड दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आह़े त्यात, आदिवासीबहुल भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याला महत्व देण्यात येऊन शहादा तालुक्यात चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आल़े परंतु साधारणत: वर्षभरापूर्वी या प्रशिक्षण केंद्राचे संपूर्ण काम झाले असल्यावरही केवळ धुळे विभागीय कार्यालयाच्या अट्टाहासामुळे चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रखडले  आह़े परिणामी सर्व सोय करुनही केवळ उद्घाटन होत नसल्याच्या कारणाने हे प्रशिक्षण केंद्र धुळखात पडले आह़े 
एसटी महामंडळाकडून अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील युवकांसाठी चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आलेले आह़े राज्यात यवतमाळ येथे हे केंद्र सुरु झाले असून त्यानंतर दुसरे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा:या नंदुरबारची निवड करुन हे चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आल़े त्यासाठी शहादा बस आगाराच्या इमारतीत या केंद्राची उभारणी करण्यात आलेली आह़े या केंद्रात अनुसूचित जमातीच्या  युवकांना चालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े 
त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी येथे निवासाची सोयसुध्दा उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आलेली आह़े परंतु उद्घाटनाच्या कारणावरुन आतार्पयत हे प्रशिक्षण केंद्र सुरु होण्यास विलंब होत आह़े एकीकडे आदिवासी विद्यार्थी तसेच युवकांसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असताना दुसरीकडे मात्र अशा प्रकारे आदिवासी युवकांच्या कल्याणकारी उपक्रमांची अंमलबजावणी होत नाही़
साहित्ये भंगारात काढण्याची वेळ
चालक प्रशिक्षण केंद्रात बहुतेक साहित्ये ही काचेची असून अनेक ठिकाणी फर्निचरचा वापर करण्यात आला आह़े सर्व सोयीसुविधा असलेल्या या प्रशिक्षण केंद्रातील इतर सामान अनेक महिन्यांपासून धुळखात आह़े त्यामुळे साहजिकच यातील बराचसा सामान आता हळूहळू खराब होत आह़े अशी स्थिती अजून काही महिने राहिल्यास प्रशिक्षण केंद्रातील महागडे साहित्ये भंगारात काढण्याची वेळ येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आह़े लाखो रुपये खर्च करुन हे चालक प्रशिक्षण केंद्र शासनाकडून उभारण्यात आले आह़े परंतु अशा प्रकारे ते पडून राहिल्याने यातून शासनाचाच पैसा वाया जात असल्याने जनसामान्यांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आह़े
प्रशिक्षण केंद्राच्या अगोदर या ठिकाणी तळीरामांचा मोठय़ा प्रमाणात वावर असायचा़ त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम झाल्याने या ठिकाणी तळीरामांवर वचक निर्माण झाला होता़ परंतु आता ब:याच महिन्यांपासून हे प्रशिक्षण केंद्र जसेच्या तसेच असल्याने पुन्हा या ठिकाणी तळीरामांचा वावर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही़ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन होऊन ते कार्यान्वित झाल्यास अनुचित घटनांनाही या ठिकाणी आळा बसणार आह़े
धुळे विभागाचे तळ्यात-मळ्यात
प्रशिक्षण केंद्राबाबत विभागीय कार्यालय धुळे येथील विभाग नियंत्रकांनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आह़े परंतु धुळे विभागाचेही प्रशिक्षण केंद्राबाबत तळ्यात-मळ्यात असल्याची स्थिती आह़े त्यामुळे शहादा आगार प्रशासनालाही पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून येत आह़े प्रशिक्षण केंद्र हे निवासी आह़े स्थानिक तसेच राज्यातील विविध भागातून आलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी येथे निवासाची सोय उपलब्ध करुन द्यावी लागणार आह़े त्यामुळे शहादा आगारालाच प्रशिक्षणार्थीसाठी ठेकेदारी पध्दतीने जेवनाची व्यवस्था, निवासाची सोय, गादी, पलंग आदी विविध आवश्यक वस्तूंची सोय करुन द्यावी लागणार आह़े परंतु अद्याप उद्घाटनांची ‘घटीका’ समिप येत नसल्याने शहादा आगारालाही हातावर हात ठेवण्याची वेळ आली आह़े प्रशिक्षण केंद्राच्या देखभालीसाठी तसेच त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आगार प्रशासनाकडून तीन सुरक्षारक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आह़े 

Web Title: Increasing costs of maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.