दुर्गम भागात पाणीटंचाईत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST2021-09-04T04:37:13+5:302021-09-04T04:37:13+5:30
बोगस बियाण्यांचा यंदाही फटका अक्कलकुवा : तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात ज्वारी उत्पादकांना यंदाही बोगस बियाण्याचा फटका बसला आहे. भांगरापाणी ...

दुर्गम भागात पाणीटंचाईत वाढ
बोगस बियाण्यांचा यंदाही फटका
अक्कलकुवा : तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात ज्वारी उत्पादकांना यंदाही बोगस बियाण्याचा फटका बसला आहे. भांगरापाणी ग्रामपंचायतींतर्गत शेतकरी बांधवांनी प्रशासनाला याबाबत निवेदनही दिले आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. तालुक्यातील इतर भागातही शेतकऱ्यांना असाच फटका बसला असल्याने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पूर्व भागात शेती पिकांची स्थिती गंभीर
नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये पिकांची स्थिती यंदा दयनीय आहे. पाण्याअभावी कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर मर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शासनाकडून सप्टेंबर अखेरीस नजर पैसेवारी करण्यात घोषित करण्यात येते. ही पाहणी महसूल विभागाने यंदा लवकर आटोपून शासनाकडे अहवाल देत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे.
यंदा स्थलांतर वाढणार
नंदुरबार : ऊसतोड तसेच इतर शेती कामांसाठी जिल्ह्यातील मजुरांना परराज्यातील ठेकेदार संपर्क करत आहेत. यातून त्यांचे व्यवहार पूर्ण झाले असून यंदा स्थलांतरितांची संख्या वाढणार आहे.