कनौजच्या ‘रुहखस’ला नंदुरबारात वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:55 IST2019-05-15T11:55:29+5:302019-05-15T11:55:35+5:30
ग्राहकी वाढली : पवित्र रमजान महिन्यानिमित्त अत्तर बाजार आला तेजीत

कनौजच्या ‘रुहखस’ला नंदुरबारात वाढली मागणी
नंदुरबार : उत्तर प्रदेशातील कनौज येथील ‘रुहखस’ अत्तराला नंदुरबारात विशेष पसंती मिळत आहे़ साधारणत: हजार रुपयाला १० ग्रॅमप्रमाणे त्याची विक्री करण्यात येत आहे़
सध्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे पर्व सुरु आहेत़ यानिमित्त विविध आकर्षक टोपी, सुरमा तसेच अत्तर बाजार तेजीत आला आहे़ रमजाननिमित्त विविध प्रकारच्या अत्तरांची विक्री होत आहे़ यामध्ये विशेषत: प्रति दहा ग्रॅमप्रमाणे उद ३००, रुहगुलाब ३००, जन्नत-ए-फिरदस २००, वाईट मस्ट ४००, केवळा ३००, चंदन ४०० रुपये प्रमाणे विकण्यात येत आहे़ तर प्रति ३ मिलीनुसार व्हाईट उद ५०, अत्तर डव ५०, चॉकलेट मस्ट ५०, पॉन्डस् ६० रुपयानुसार विक्री करण्यात येत आहे़ यासह मोगरा, चमेली, चंदन आदी अत्तरांच्या प्रकारालाही मागणी असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आले़ दरम्यान, आतापर्यंत केवळ अत्तर बाजारातून ५० हजारांहून अधिकची उलाढाल झालेली आहे़