वादळाची तीव्रता कमी होताच तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:01 IST2019-05-07T18:00:51+5:302019-05-07T18:01:21+5:30

उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढला : नंदुरबारचा पारा पुन्हा चाळिशी पार

An increase in temperature as the intensity of the storm decreases | वादळाची तीव्रता कमी होताच तापमानात वाढ

वादळाची तीव्रता कमी होताच तापमानात वाढ

नंदुरबार : फोनी चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच जिल्ह्यासह खान्देशातील तापमानात पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे़ वादळाच्या काळात ३८ अंशावर गेलेले किमान तापमान मंगळवारी पुन्हा वाढून ४०.४ अंशावर गेले़
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फोनी चक्रीवादळामुळे गेल्या पंधरवाड्यापासून ओडीसा व नंतर पश्चिम बंगालमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते़ वादळामुळे राज्यातील कमाल तापमानातही सुमारे ३ ते ४ अंशाने घट झालेली होती़
नंदुरबारसह जळगाव व धुळ्याचे तापमानही काही दिवसांसाठी ४० अंशाच्या खाली गेले होते़ काही ठिकाणी तुरळक पाऊस व ढगाळ हवामानाची निर्मिती झाली होती़ परंतु आता चक्रीवादळ काहीसे निवळल्याचे लक्षण दिसू लागत असतानाच आता पुन्हा जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे़ जळगाव व धुळ्यात कमाल तापमान पुन्हा ४२ अंशावर गेलेले दिसून येत आहे़ मंगळवारी नंदुरबारात तर तब्बल ५८ टक्के इतकी आद्रतेची नोंद झालेली आहे़ त्यामुळे दुपारी व रात्रीच्या वेळी कमालीचा उकाडा जाणवत आहे़
दरम्यान, नंदुरबारात सध्या ताशी १४ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ रात्रीच्या वेळी सपाटीवरील भागात वेगवान वारे वाहत असल्याने केळी व पपईसारख्या पिकांचेही बºयापैकी नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़ पुढील अजून तीन ते चार दिवस वाºयांचा वेग अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे़ वाढत्या आद्रतेने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़

Web Title: An increase in temperature as the intensity of the storm decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.