निर्णय प्रक्रियेत महिलांचा टक्का वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:33 IST2018-11-19T12:33:34+5:302018-11-19T12:33:39+5:30
लेवा पाटीदार गुजर समाज अधिवेशन : विविध विषयांवर चर्चा, अनेक ठरावांना सर्वानुमते संमती

निर्णय प्रक्रियेत महिलांचा टक्का वाढवा
प्रकाशा : कुटुंबासह समाजाच्या जडणघडणीत महिलांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे मुलगी व सून यात भेद न करता दोघांनाही सारखीच वागणूक द्यावी. समाजाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनी रविवारी येथे केले.
येथील अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन रविवारी झाले. समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दीपक पाटील अध्यक्षस्थानी होते. महिला आघाडीच्या अध्यक्षा कमलताई पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, माधव पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, युवा मंचचे अध्यक्ष श्रीपत पाटील, मोहन चौधरी, हरी पाटील, जयदेव पाटील, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, रमेश पाटील, विजय विठ्ठल पाटील, जगदीश पटेल, मोहन चौधरी आदींसह खान्देश, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील समाज बांधव व महिला उपस्थित होते. सकाळी साडेआठ वाजता समाजाच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. दीपप्रज्वलनानंतर अन्नपूर्णा माता, स्व.पी.के.आण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजाचे सचिव सुनील पाटील यांनी अहवाल वाचन केले. धुळे येथील न्या.प्रतीभा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, यशस्वी ठरलेल्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समाजाच्या भगिनींच्या ‘ओटय़ावरच्या चर्चा’ या विषयावर माधवी पाटील व महिला मंडळाने नाटिका सादर केली. समाजाच्या विविध अडीअडचणींवर चर्चा झाली.
दीपक पाटील म्हणाले की, समाजातील अनिष्ट रुढी परंपरांना पायबंद घालणे, शिक्षण, शेती, व्यवसायाच्या माध्यमातून समाजाची प्रगती व्हावी त्यादृष्टीने सर्वानी प्रय} करावे. समाजसाठीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. परिवारात महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांना स्थान द्यावे. सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद त्यांच्यात असल्याने त्यांचाही आदर व्हावा.
गुजर समाज मंचतर्फे लहान शहादे येथे 10 फेब्रुवारीला तसेच विविध शहर ग्राम गुजर मंडळातर्फे 20 एप्रिल रोजी प्रकाशा येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. समाजासाठी तक्रार निवारण समिती, आरोग्य समिती, शेतीविषयक समिती आदीविविध समित्या गठीत करून समाजाला न्याय दिला जाईल, असेही दीपक पाटील यांनी सांगितले.
सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, डॉ.वसंत पाटील, सुभाष पाटील, दीपकनाथ पाटील, मोनालिसा पाटील, डॉ.सविता पाटील, नुपूर पाटील, सुदाम पाटील, गोविंद पाटील आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन के.डी. पाटील यांनी तर आभार दिलीप ज्ञानदेव पाटील यांनी मानले.