नंदुरबारात स्थलांतरीत मजुरांच्या संख्येत वाढच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:44 IST2018-11-20T11:43:58+5:302018-11-20T11:44:03+5:30

दुष्काळाच्या झळा : कोठारसह परिसरातील गावे पडताय ओस

Increase in number of migrant workers shifted to Nandurbar | नंदुरबारात स्थलांतरीत मजुरांच्या संख्येत वाढच

नंदुरबारात स्थलांतरीत मजुरांच्या संख्येत वाढच

कोठार :  तळोदा तालुक्यातील कोठार परिसरातून मजुरांचे स्थलांतर सुरू आह़े त्यामुळे परिसरातील गावे ओस पडू लागली आहेत़ प्रशासनाने याबाबत उपाय योजना करण्याची मागणी आह़े 
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असणा:या तळोदा तालुक्यातील कोठार व परिसरातील गावांमधून दरवर्षी हंगामी रोजगारासाठी शेजारी गुजरात राज्यात शेकडो कुटुंब स्थलांतरित होत असतात़ या वर्षी परिसरासह जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर मजुराची स्थलांतरीत होणा:या कुटुंबियांची संख्या वाढलेली आहे. दिवाळीनंतर सातपुडय़ाच्या पायथ्याशी व सातपुडय़ातून होणारे स्थलांतर हे मागील दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. त्याची तीव्रता आता अधिक वाढू लागली आह़े परिसरातून रोजगारासाठी मोठय़ा संख्येने  कुटुंबीय शेजारच्या गुजरात राज्यात हंगामी रोजगारासाठी बि:हाड घेवून निघू लागले आहेत़ 
मजुरांचे स्थलांतर सुरू झाल्याने नेहमी गजबजलेली परिसरातील गावे ओस पडू लागल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. शेती व शेतमजुरी हा या परिसरातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आह़े परंतु यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याकारणाने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आह़े त्यामुळे शेतीवर आधारीत शेतमजुरीदेखील रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही़  हंगामी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शेतमजूर गुजरात राज्यात ऊस तोडणीसाठी जाणे पसंत करत आहेत़
परिसरातील विविध गावातून दररोज सरासरी दहा कुटुंब स्थलांतरीत होत असल्याचे सांगितले जात आह़े कुटुंब स्थलांतरीत होत असल्या कारणाने त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ घातला आह़े 
अनेकदा पालक आपल्या पाल्यांना मजुरीसाठी आपल्या सोबत घेऊन जात असतात़ त्यामुळे ते शिक्षणापासून दूर होतात़ अशामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असत़े  मजुरीसाठी परराज्यात स्थलांतरीत होत असताना विद्याथ्र्याना सोबत घेऊन जाता कामा नये यासाठी पालकांचे प्रबोधन होणे आवश्यक आह़़े यंदा जिल्ह्यात दुष्काळ असल्याने स्थलांतराचे प्रमाण वाढले आह़े गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच अनेक जण मुकादमांकडून आगाऊ रकमेची उचल करतात.साखर कारखान्यांची यंत्रणा, मुकादम गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच मजुरांची बांधणी करत असतात. केवळ ऊस तोडणीसाठीच नव्हे तर परराज्यात मंजुरीसाठी गेल्यानंतर मिळेल ते काम मजूर करत असतात.तळोदा तालुक्यातील सातपुडय़ाच्या पायथ्याशी असणा:या कोठार,तोलाचापड,चौगाव,अंबागव्हाण,रापापुर,लक्कडकोट,कुलीडाबरी,गौ:या जांभई,वरपाडा,सावरपाडा,बंधारा,अलवान आदी गावांतून शेकडो रोजगार दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतरीत होत असतात.याशिवाय धडगांव तालुक्यातील वावी, बोडला,शिरसानी,माळ,चांदसैली,पिंपळबारी, चित्तार आदी परिसरातील कुटुंबाचादेखील सहभाग असतो. सातपुडय़ाच्या पंचक्रोशीतून रोजगाराच्या शोधासाठी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांचे होणारे स्थलांतर ही एक मोठी समस्या बनली आहे.शासन,प्रशासनाकडून दरवर्षी हे स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जातात.पण अद्यापदेखील त्यात यश आलेले दिसून येत नाही.
 

Web Title: Increase in number of migrant workers shifted to Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.