शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

आदिवासींचे वनक्षेत्र अधिकार वाढवावे - दिग्विजय सिंग

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: November 21, 2017 12:08 PM

महाराष्ट्रातील परिक्रमा यात्रेचा शेवट, सहावी अनुसूची लावावी

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी हेच खरे निसर्गाचे रक्षणकर्ते आह़े त्यामुळे त्यांच्या वनक्षेत्र अधिकारात अधिक वाढ झाली पाहिज़े जंगलाच्या संरक्षणाचे अधिकारी आदिवासी बांधवांना दिले पाहिजे अशी मागणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केली़ यासोबतच केंद्रशासनाने आदिवासी भागात सहावी अनुसूचीची तरतुद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली़ सिंग यांनी सुरु केलेल्या 51 दिवसांपासूनच्या नर्मदा परिक्रमा यात्रेचा महाराष्ट्रातील शेवट कुकडीपादर ता़ अक्कलकुवा येथे झाला़ सोमवारी दुपारी ते गुजरात राज्यातील कनजी गावाच्या दिशेने रवाना झाल़े त्यांना आमदार क़ेसी़ पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातून निरोप देण्यात आला़ सिंग याच्यासोबत सुमारे पाचशे नर्मदा परिक्रमा यात्री उपस्थित होत़े सिंग यांनी ‘लोकमत’शी संवाद साधत महाराष्ट्रातील नर्मदा परिक्रमेबाबत अनुभव व्यक्त केल़े सिंग यांनी 30 सप्टेंबरला परिक्रमा यात्रेला सुरुवात केली होती़ 12 नोव्हेंबर रोजी ते यात्रेसाठी महाराष्ट्रात दाखल झाले होत़े यात्रेचा एकूण प्रवास 3 हजार 840 किमी इतका आह़े त्यांनी आतार्पयत एकूण 900 किमीचा प्रवास केला असून राज्यात त्याचा प्रवास 160 किमी इतका झाला आह़े या परिक्रमा यात्रेत त्यांच्यासोबत पत्नी अमृता रॉय-सिंग, मुला जयवर्धन सिंग, भाऊ लक्ष्मण सिंग, सहकारी रामेश्र्वर निखरा, नारायन सिंग, नरेंद्र लाहोटी हेदखील आहेत़ नर्मदेची परिक्रमा करण्याची अनुभूती आपणास झाली व त्यामुळे आपण नर्मदेची परिक्रमा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिंग यांच्याकडून सांगण्यात आल़े अमृता रॉय यांची प्रकृती खालावलीगेल्या अनेक दिवसांपासूनच्या पायी प्रवासामुळे दिग्विजय सिंग यांच्या पत्नी अमृता रॉय यांची प्रकृती काहीशी खालावली आह़े त्यांना ताप आला असून स्थानिक वैद्यकीय अधिका:यांकडून त्यांची प्रकृतीची तपासणी करण्यात आली आह़े पुनर्वसनाचे काम समाधानकारकनर्मदा प्रकल्पातील विस्तापितांचे महाराष्ट्रात चांगले पुनर्वसन झाले असल्याचे मत सिंग यांनी व्यक्त केल़े त्याच सोबत नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांच्यासह राज्य सरकारलाही याचे श्रेय जात असल्याची पावतीही त्यांनी दिली़ त्याच प्रमाणे नर्मदेचे पाणी हे गुजरातमधील शेतक:यांसाठी आहे की केवळ व्यापा:यांसाठी आहे असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला़नरेगाची कामे पूर्णपणे खोळंबलीशासनाच्या नरेगाची कामे महाराष्ट्रात खोळंबली असल्याचा आरोप सिंग यांच्याकडून करण्यात आला़ आदिवासी बांधवांना रोजगार नाही़ त्यामुळे शासनाने येथेच आदिवासी बांधवांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आह़े त्याच प्रमाणे ज्या क्षेत्रात खरोखर रोजगाराची गरज आहे, अशाच क्षेत्रात नरेगा योजना लागू करण्यात यावी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केल़े यामुळे मजुरांचे होणारे स्थलांतरही थांबण्यास मदत होणार आह़े