शहादा बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय; ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने करावी लागतेय कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:35+5:302021-08-20T04:34:35+5:30
धुळे विभागात सर्वात जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून शहादा आगाराचे नाव प्रथम क्रमांकावर असले, तरी शहादा आगाराकडे वरिष्ठ स्तरावरून ...

शहादा बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय; ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने करावी लागतेय कसरत
धुळे विभागात सर्वात जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून शहादा आगाराचे नाव प्रथम क्रमांकावर असले, तरी शहादा आगाराकडे वरिष्ठ स्तरावरून प्रवाशांसाठी कुठलीही सुखसुविधा पुरवली जात नाही, अशी तक्रार प्रवासीवर्गाकडून वारंवार होत आहे. आगार उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असले तरी शहादा आगार परिसरातील परिस्थिती खूपच दयनीय आहे. प्रवासीवर्गाकडून शहादा आगारातील सोयीसुविधांसंंदर्भात वेळोवेळी धुळे विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु, प्रवासीवर्गाच्या कुठल्याही अडचणी सोडवल्या जात नसल्याने नाराजी पसरली आहे. वास्तविक पाहता वर्षभरापासून कोविडमुळे सर्वांनी स्वच्छतेचे धडे घेतले असले, तरी आगारातील डबक्यांमुळे प्रवाशांंचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बसच्या दारापर्यंत वाहन
बसस्थानकात सर्वत्र पाणी साचल्याने प्रवासीवर्गाला सोडण्यासाठी येणाऱ्या खाजगी गाड्या थेट आगारातील बसेसपर्यंत न्याव्या लागत आहेत. वास्तविक पाहता आगारात खाजगी वाहनांना प्रवेशबंदी आहे. परंतु, प्रवाशांना डबक्यातून मार्ग काढणे जिकिरीचे होत असल्याने थेट बसच्या दरवाजापर्यंत खाजगी वाहन न्यावे लागत आहे.