खापर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:44 IST2018-07-06T12:44:24+5:302018-07-06T12:44:31+5:30

Inauguration of various development works at Khapar | खापर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

खापर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामपंचायतीतर्फे गावातील विविध भागात रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली़
कामांचे उद्घाटन सरपंच करुणाबाई वसावे यांच्या हस्ते करण्यात आला़ 
याप्रसंगी पंचायत समिती सदस्या कविताबाई कामे, उपसरपंच विनोद कामे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य देवीदास वसावे, जगदीश चित्रकथी, राजाराम पाडवी, भूषण कामे, दिपक वसावे, अविनाश पाडवी, विद्याबाई कापूरे, अंजनाबाई पाडवी, दक्षाबाई वसावे, अरुणाबाई पाडवी, निर्मलाबाई पाडवी, मोनीका भोई, राणुलाल जैन, अशोक जैन, सत्तार पटेल, धर्मेद्र वसावे, सुनील सूर्यवंशी, जब्बार खाटीक, रोहिदास लोहार आदी उपस्थित होत़े वार्ड क्ऱएक मधील मच्छीमार गल्लीमध्ये 14 वा वित्त आयोगातून काँक्रीटीकरण, वार्ड क्ऱ 3, 5 व 6 मध्ये काँक्रीटीकरण तर वार्ड 4 मध्ये पेव्हरब्लॉक बसविण्याच्या कामाचीही सुरुवात करण्यात आली आह़े 
 

Web Title: Inauguration of various development works at Khapar