फेस येथे श्रीपंचकृष्ण मंदिरातील सामाजिक सभागृहाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:21+5:302021-08-22T04:33:21+5:30
लड्डू चौधरी, माजी सरपंच वंदना साळुंके, किशोर पाटील, रमेश पाटील, योगेश व्ही. पाटील, माजी सरपंच बापू मराठे, देविल पाटील, ...

फेस येथे श्रीपंचकृष्ण मंदिरातील सामाजिक सभागृहाचा शुभारंभ
लड्डू चौधरी, माजी सरपंच वंदना साळुंके, किशोर पाटील, रमेश पाटील, योगेश व्ही. पाटील, माजी सरपंच बापू मराठे, देविल पाटील, सरपंच मनीष गरूड, मनोज चौधरी, वसंत चौधरी, शरद पाटील, हेमकांत पाटील, आदींसह उपस्थित होते.
ध्वज व सामाजिक सभागृह अनावरण
भक्तिमय वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत महानुभाव संप्रदायातील समग्र विश्वाला सुख शांतीचे प्रतीक देणाऱ्या पांढराशुभ्र ध्वजाचे अनावरण खासदार डॉ.हीना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक सभागृहाचे फलक अनावरण डॉ विजयकुमार गावीत, सुप्रिया गावीत, जयपालसिंह रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीपंचकृष्ण मंदिरात विधिवत पूजा
पंचक श्रीकृष्ण मंदिराच्या गाभाऱ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीकृष्णाला विधीवत पूजा करीत महाआरती करण्यात आली. यानंतर डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, केंद्रसरकारातर्फे महिला बचत गटांसाठी ज्या ज्या योजना आहेत. त्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील महिला बचत गटांना घेता यावा यासाठी मी प्रयत्नशील आहे.
या वेळी डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले की, आमच्या परिवाराचा एकच ध्यास आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचविणे व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंतच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा मूळ उद्देश आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच अशी ग्वाही दिली. या वेळी परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महानूभाव पंथीय सांप्रदायातील भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.महंत संवस्तरकर बाबा तर आभार मणिलाल पाटील यांनी मानले.