शहाद्यात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:15+5:302021-09-02T05:05:15+5:30
या वेळी माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, दीपक गवते, जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे, उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी, युवासेना जिल्हा ...

शहाद्यात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
या वेळी माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, दीपक गवते, जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे, उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी, युवासेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, शहर प्रमुख रोहनकुमार माळी, उपजिल्हा युवाधिकारी सागर पाटील, गोपाल भंडारी, तालुका युवाधिकारी सुजित पावरा, तालुका उपप्रमुख उत्तम पाटील, डॉ. सागर पाटील, अविनाश पाटील, तालुका प्रमुख शेतकरी आघाडी सुभाष पाटील उपस्थित होते.
या वेळी चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार सांभाळल्यानंतर महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना, महापूर यासारख्या मोठ्या संकटातून सावरण्यासाठी मोठे कार्य केले. मुख्यमंत्री पदाचा कुठलाही बडेजाव न मिरवता साध्या राहणीमानाची सर्वसमावेशक प्रतिमा सर्व भारतात आकर्षण निर्माण करतेय. गरीब नवाज कॉलनीतील हा प्रचंड प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यात त्यांचे स्थान टॉपमध्ये येते, असे सांगितले.
कार्यक्रमास बापू सुर्यवंशी, रमेश कुवर, गटप्रमुख जयसिंग गरुड, माजी नगरसेवक विनोद चौधरी, मुकेश चौधरी, तालुका संघटक भगवान अलकरी, शहर संघटक गणेश चित्रकथे, माजी शहर प्रमुख बापू चौधरी, सुरेश माळी, दिलीप पाटील, शिवसेनेचे कार्यकर्ते अब्दुल कादीर, जावेद उस्ताद, इम्रान शेख, बाबा शेख, अलमास मिस्तरी, शोएब मंत्री, अशपाक शहा, इरफान मन्सुरी, आकीब बागवान, खालीद शहा, मोहसीन मिस्तरी, शोएब खाटीक, मोईन शेख, जुनेद पिंजारी, अरबाज शेख, वसीम शेख, इरफान शेख, दीपक खेडकर, ऋषिकेश शिवदे व शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजमल जैन यांनी तर आभार अब्दुल कादीर यांनी मानले.