सोमावल येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:53+5:302021-08-20T04:34:53+5:30

याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्राला ५० गावे जोडलेली असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा चांगला लाभ होईल. प्राथमिक ...

Inauguration of Primary Health Center at Somaval by the Guardian Minister | सोमावल येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सोमावल येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्राला ५० गावे जोडलेली असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा चांगला लाभ होईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात झाल्यास चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील. तसेच जागा उपलब्ध करून दिल्यास केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी प्रयत्न करता येईल. परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगून कोविडचे संकट अद्याप ही पूर्णपणे गेले नसल्याने नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अँड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हे केंद तयार करण्यात आले असून, त्यासाठी एक कोटी ८५ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे, अशी माहिती डाॅ.नितीन बोडके यांनी दिली.

कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर ठाकरे, डॉ.सागर वसावे, डॉ.विशाल चौधरी, डॉ.प्रशांत पवार, डॉ.दीपेश बोरसे, डॉ.प्रशांत वळवी, डॉ.गौरव सोनवणे, डॉ.तुषार पटेल, डॉ.छाया पाडवी, डॉ.हर्षदा पाडवींसह लॅब टेक्निशियन के.एस. कुवर, आरोग्य सहायक एस.ए. ठाकरे, औषध निर्माण अधिकारी योगेश पडयाळ, आरोग्य सहायक ए.व्ही.कोतक, एल.एस. करमकर, जयश्री वसावे, आशा सुपरवायझर मालती वळवी, उर्मिला गावित, परिचर मनिषा साळवे, परिचर दत्तू बोरसे, क्लर्क भिमसिंग पाडवी, करण पाडवी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Inauguration of Primary Health Center at Somaval by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.