नवापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 12:24 IST2018-01-28T12:23:56+5:302018-01-28T12:24:04+5:30

नवापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापनानिमित्त जनतेला नवापूर येथील नूतन तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत समर्पित करताना आनंद होत आहे. अशा सुसज्ज इमारतीत जनतेला तत्परतेने सेवा देण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचा:यांनी कटिबद्ध राहून शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकार्पयत पोहोचवा, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नवापूर येथे केले.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, माजी खासदार माणिकराव गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अ.ल. पवार, सहाय्यक अभियंता एस.बी. पडांगळे, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाघमारे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अजित नाईक, गणेश वडनेरे, नीलेश प्रजापती, जाकीर पठाण, नरेंद्र नगराळे, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, डिजिटल इंडियाच्या वाटेवर चालताना पारदर्शी कामाची अपेक्षा ठेवून एकाच छताखाली राबविण्यात येणा:या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच कार्यालयात येणा:या प्रत्येक नागरिकांचे समाधान म्हणजे आपल्या कामाची पावती समजून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. एकाच छताखाली अशा सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यातही मध्यवर्ती प्रशासकीय इमारती उभारण्यासाठी प्रस्तावीत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार गावीत यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत संकल्पना म्हणजे एका इमारतीमध्ये नागरिकांना सर्व सुविधा मिळणे अशी आहे. या इमारतीमुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर सोय होणार आहे. तसेच सर्व सुविधा सहज व तत्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी या इमारतीमधील सर्व शासकीय कार्यालये डिजिटलाईज करण्यात यावीत.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले की, लोकाभिमूख प्रशासन असावे यासाठी सर्व कार्यालये एका ठिकाणी कार्यरत राहण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून, सर्व कार्यालयातील रेकॉर्ड ऑनलाईन करण्यात येणार आहे.
अधिकारी, कर्मचारी हे जनतेचे सेवक असून, त्यांनी या इमारतीमध्ये येणा:या जनतेला तत्काळ व चांगल्या सेवा द्याव्यात. त्याचप्रमाणे इमारत नवीन असल्याने इमारतीमध्ये स्वच्छता चांगली ठेवावी.
याप्रसंगी इमारतीचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल कंत्राटदार एस.एस. मुर्ती, व्ही.एच. ओतारी व सहाय्यक अभियंता एस.बी. पडांगळे यांचा पालकमंत्री रावल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक आय.जी. पठाण यांनी केले.