शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब नंदनगरीचा पदग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोटरी क्लब आॅफ नंदनगरीचा तिसरा पदग्रहण सोहळा येथे झाला. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी प्रार्थनेने झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रोटरी क्लब आॅफ नंदनगरीचा तिसरा पदग्रहण सोहळा येथे झाला. कार्यक्रमाची सुरुवात रोटरी प्रार्थनेने झाली. या वेळी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी शपथ देण्यात आली.
कार्यक्रमास खासदार डॉ.हीना गावीत, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर प्रशांत जानी, हेता जानी, श्रीकांत इंदाणी, अनिश शाह, रोटरी नंदनगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, माजी अध्यक्ष प्रीतीश बांगड आदी उपस्थित होते.
या पदग्रहण समारंभात डिस्ट्रीक्ट गव्हर्नर प्रशांत जानी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष नागसेन पेंढारकर व सचिव मनोज गायकवाड यांना शपथ दिली. याप्रसंगी खासदार डॉ.हीना गावीत व जि.प.चे उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांना रोटरी क्लब नंदनगरीचे मानस सदस्यत्व प्रदान करण्यात आले. नवीन सदस्य म्हणून डॉ.गौरव तांबोळी, डॉ.स्वप्निल महाजन, प्रवीण पाटील, इकबाल शेख, आकाश चौधरी, दिक्षांत सारडा, अब्बास काटावाला, राकेश आव्हाड, जुझर बोहरी यांना रोटरी पिन लावून रोटरी क्लब नंदनगरीमध्ये समाविष्ट करण्यात आले. प्रशांत जानी, श्रीकांत इंदाणी, प्रीतीश बांगड, नागसेन पेंढारकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील नवनिर्माण संस्था, अस्तित्व फाऊंडेशन, श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन, जमीअत उलमा ऐ हिन्द या संस्थांचा तसेच रोटरी नंदनगरीच्या सदस्यांच्या कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आॅनलाईन गीतगायन स्पर्धा व्हॉईस आॅफ नंदुरबार या स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम रागिणी शिंदे, द्वितीय पार्थ घासकडबी, तृतीय महिमा वळवी तर उत्तेजनार्थ म्हणून दीपक जाधव, रोहिणी पिंपळे, केतकी गोहील यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. कार्यक्रमात कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व खबरदारी घेण्यात आली होती.
कार्यक्रमात मिटिंग कॉल टू आॅर्डर अनिल शर्मा यांनी तर फोर वे टेस्ट आकाश जैन यांनी म्हटले. सूत्रसंचालन किरण दाभाडे तर आभार सचिव मनोज गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवराज पाटील, मनीष बाफना, दिनेश साळुंखे, रमाकांत पाटील, हाकिम लोखंडवाला, विवेक जैन, हर्षल पाटील, मुर्तुझा वोरा, इसरार सैयद, फकरुद्दीन जलगुणवाला, प्रवीण येवले, सॅमूवेल लवणे, अ‍ॅड.प्रेमानंद इंद्रजित, विनोद जैन, अपूर्व पटेल, महेंद्र झंवर, रवी नानकानी, दीपक सेवाणी, विजय मंगलानी, अभिजित जाधव यांच्यासह रोटरी क्लब आॅफ नंदनगरीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.