शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम घाट आगीच्या विळख्यात, जंगलात वनवा पेटला; मध्यरात्रीपर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:07 IST

घटनास्थळी रात्री नवापूर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वनमजूर व परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी जंगलात रवाना झाले.

- रमाकांत पाटील

नंदुरबार : नवापूर शहरातील उत्तर भागात असलेल्या पश्चिम घाटाच्या जंगलात काल रात्रीपासून वनवा पेटत असल्याचे दृश्य दिसत होते.धगधगता वनवा पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. यासंदर्भात वन्यप्रेमींनी वनविभागाला संपर्क केल्यानंतर वनविभागाला जाग आली. घटनास्थळी रात्री नवापूर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी वनमजूर व परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी जंगलात रवाना झाले.

डोंगराच्या एका बाजूची आग काही तासातच नियंत्रणात आणली परंतु दुसऱ्या बाजूला जामतलावचा परिसरातील जंगलात आग मध्यरात्रीपर्यंत धगधगत होती.या आगीमुळे पश्चिम घाटातील दुर्मिळ वनौषधी, वनस्पती,जैवविविधता धोक्यात आल्याची परिस्थिती आहे.या संदर्भात वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे आग कशामुळे लागते याचा देखील शोध वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा.

पश्चिम घाट हा जगातील आठ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक आहे. पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर पासून ते थेट कन्याकुमारी पर्यंत आहे. पश्चिम घाटातील या जंगलात काल आग लागली आणि वणवा पसरला. वन विभाग व ग्रामस्थ सातत्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग विझवण्यासाठी दूर्गम भाग, तीव्र वारे आणि उच्च तापमानामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

आगीत कोणत्याही प्रचाराचे नुकसान न झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे.आगीत फक्त कोरडा चारा व गवत जळत असते असे वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांनी सांगितले. जंगलात पुन्हा आग लागू नये यासाठी वनविभागाने नियोजन करणे गरजेचे आहे अन्यथा मौल्यवान वनस्पती,दुर्मिळ वनौषधी,जैवविविधता नष्ट होईल वनविभागाच्या अधिकाऱ्याने देखील नवापूरच्या जंगलात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :fireआग