उसनवारीचे पैसे परत मागितल्याचा रागातून जावयाच्या डोक्यात घातला दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2023 21:48 IST2023-04-17T21:47:19+5:302023-04-17T21:48:08+5:30
डोक्यात दगड टाकून जबर जखमी केले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

उसनवारीचे पैसे परत मागितल्याचा रागातून जावयाच्या डोक्यात घातला दगड
रमाकांत पाटील
नंदुरबार : सासऱ्यांना उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग येऊन जावयास सासऱ्यासह तिघांनी मारहाण करून डोक्यात दगड टाकून जखमी केल्याची घटना धडगाव येथे १६ रोजी घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, धडगाव येथील भीमनगर भागात राहणारे मनोहर बालसिंग हुरेज (२७) यांनी त्यांचे सासरे गणेश रमेश ठाकूर यांना उसनवारीने पैसे दिले होते. ते पैसे बालसिंग यांनी परत मागितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. गणेश ठाकूर यांच्यासह तिघांनी मनोहर यांना हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. डोक्यात दगड टाकून जबर जखमी केले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मनोहर बालसिंग हुरेज यांनी फिर्याद दिल्याने गणेश रमेश ठाकूर (५०), मनीषा गणेश ठाकूर (४५) रा. भीमनगर, धडगाव, सुनीता मनोहर हुरेज (२४), रा.पालखा यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस कर्मचारी शशिकांत वसईकर करीत आहेत.