शहादा बसस्थानकावरून महिलेची पोत लांबविली
By Admin | Updated: January 21, 2017 00:08 IST2017-01-21T00:08:40+5:302017-01-21T00:08:40+5:30
नंदुरबार : बसमध्ये चढणा:या महिलेच्या गळ्यातील पोत चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना शहादा बसस्थानकात घडली़

शहादा बसस्थानकावरून महिलेची पोत लांबविली
नंदुरबार : बसमध्ये चढणा:या महिलेच्या गळ्यातील पोत चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना शहादा बसस्थानकात घडली़ 16 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेबाबत धुळे येथील दाम्पत्याने शुक्रवारी शहादा पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली आह़े
सोमवारी धुळे येथील आदर्श कृषी कॉलनीतील रहिवासी भगवान श्रावण बागुल हे पत्नी शकुंतला बागुल यांच्यासोबत शहादा येथून धुळे येथे परत जाण्यासाठी बसस्थानकात आल़े यावेळी ते व त्यांची पत्नी हे दोघेही शहादा-औरंगाबाद या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटय़ाने शकुंतला बागुल यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ काढला़ या घटनेनंतर या दाम्पत्याने शुक्रवारी शहादा पोलीस ठाणे गाठल़े याबाबत भगवान बागुल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहरात सोनपोत लंपास करणारे पुन्हा सक्रिय झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आह़े