भरारी पथकांच्या कार्यपद्धतीमुळे परिक्षार्र्थींच्या मनोधैर्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:32 IST2020-03-02T11:31:54+5:302020-03-02T11:32:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बारावी परीक्षेसाठी नेमलेल्या भरारी पथकातील काही अधिकारी तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे मनोधैर्य कमी करीत असल्याचे ...

भरारी पथकांच्या कार्यपद्धतीमुळे परिक्षार्र्थींच्या मनोधैर्यावर परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बारावी परीक्षेसाठी नेमलेल्या भरारी पथकातील काही अधिकारी तपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे मनोधैर्य कमी करीत असल्याचे प्रकार परीक्षा केंद्रांवर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कॉपी केस करतांना कुठलीही शहनिशा न करता व विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून न घेता कारवाई केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबधितांना सुचना देवून कार्यपद्धती बदलण्यासंदर्भात सुचीत करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
सध्या सुरू असलेल्या बारावी परीक्षेसाठी व मंगळवारपासून सुरू होणाºया दहावी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकातील काही अतीउत्साही अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्याव्यतिरिक्त दुसºया तालुक्यांच्या परिक्षा केंद्रांवर जावून कॉपी संदर्भात तपासणी करीत आहे. या अधिकाऱ्यांची वागण्याची पद्धत आणि तपासणीच्या पद्धतीमुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे मनोबल कमी होत आहे. एकच पथक एवढ्या कॉपी केस कसे करीत आहेत हा संशोधनाचा विषयही ठरत आहे.
शिवाय कॉपी केस करतांना संबधीत विद्यार्थ्याचे म्हणने ऐकुण घेणे नैसर्गिक न्यायाला धरून असतांना सरळ कॉपी केस करून संबधीत अधिकारी मोकळे होत आहेत. बेंचजवळ कॉपी पडलेली असली तरी संबधीत विद्यार्थ्याला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे कॉपी करणारा नामनिराळा व दुसराच विद्यार्थी भरडला जात आहे. नंदुरबार शहरातील एका केंद्रावर शुक्रवारी असा प्रकार घडल्याने संबधित विद्यार्थीनीला कारवाईला सामोरे जावे लागले.
शिवाय नेमून दिलेल्या तालुक्याव्यतिरिक्त दुसºया तालुक्याच्या परिक्षा केंद्रावर जावून कारवाई केली जात असल्याने शिक्षण विभागातीलच काही अधिकारी संबधित भरारी पथकावर नाराज आहेत.
जिल्हाधिकाºयांनी या प्रकाराची दखल घेवून विद्यार्थ्यांचे मनोबल कमी होणार नाही अशा पद्धतीने भरारी पथकांनी वागावे अशा सुचना द्याव्या अशी मागणी शिक्षकांसह पालक वर्गाकडून केली जात आहे.