नंदुरबारात विसजर्न मिरवणुका उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:04 IST2019-09-08T12:03:24+5:302019-09-08T12:04:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्याचे गणेश विसजर्न रात्री उशीरार्पयत उत्साहात सुरू होते. 34 सार्वजनिक मंडळांनी व ...

Immersion procession in Nandurbar | नंदुरबारात विसजर्न मिरवणुका उत्साहात

नंदुरबारात विसजर्न मिरवणुका उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्याचे गणेश विसजर्न रात्री उशीरार्पयत उत्साहात सुरू होते. 34 सार्वजनिक मंडळांनी व तीन खाजगी मंडळांनी या विसजर्न मिरवणुकीत सहभाग घेतला. यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी रात्री 12 वाजेर्पयत ध्वनी मर्यादा शिथील असल्यामुळे रात्री उशीरार्पयत मिरवुणका सुरू होत्या.   
नंदुरबारात दोन टप्प्यात गणपती विसजर्न केले जाते. पहिला टप्पा हा गौरी विसजर्नाच्या दिवसाचा आणि दुसरा व अंतिम टप्पा हा अनंत चतुदर्शीचा असतो. या दोन्ही टप्प्यात अनेक मोठय़ा मंडळांचा समावेश राहत असल्यामुळे मिरवणुकाही मोठय़ा राहतात. परिणामी पोलिसांवर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असतो. 
मोठी तालीम मंडळे 
पहिल्या टप्प्यात अनेक मोठय़ा तालीम मंडळांचा समावेश मुख्य विसजर्न मिरवणुकीत होता. सुभाष चौकातून मंगळ बाजार, गणपती मंदीर, सोनार खुंट, टिळक रोड, जळका बाजार, शिवाजीरोड मार्गे मिरवणुका पुढे नेण्यात आल्या. काही मंडळांनी परस्पर अर्थात आपल्या परिसरातच मिरवणुका काढून परस्पर विसजर्नाला प्राधान्य दिले. मुख्य मिरवणूक मार्गावर 12 पेक्षा अधीक मंडळांनी मिरवणुका नेल्या. सर्वच मंडळाच्या कार्यकत्र्यामध्ये उत्साह दिसून आला.
मुख्य मार्गावर बॅरीकेट्स 
मुख्य मिरवणूक मार्गाला मिळणा:या इतर लहान रस्तांना बॅरीकेट्स लावण्यात आले होते. पोलिसांनी देखील ठिकठिकाणी बॅरीकेटींग केली होती. पालिकेतर्फे काही ठिकाणी पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून देत पाण्याची सोय करण्यात आली होती. 
पालिकेतर्फे सोय
पालिकेतर्फे मूर्ती विसजर्नासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती. सोनी विहिरीजवळ त्यासाठी वाहने उभी करण्यात आली होती. अनेक सार्वजनिक मंडळे व खाजगी मंडळे आणि घरगुती मूर्ती देखील या वाहनांवर ठेवण्यात आल्या. 

शहादा येथे शुक्रवारी पहिल्या टप्प्याच्या गणेश विसजर्न मिरवणुकीत किरकोळ वाद झाला. त्याचे पडसाद पोलिसांनी कुठेही उमटू दिले नाहीत. परंतु असे असतानांही शनिवारी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. नंदुरबारात सहा वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यातील विसजर्न मिरवणुकीला गालबोट लागले होते. त्यामुळे अधिकचा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार यांनी ठिकठिकाणी स्वत: भेटी देत बंदोबस्ताचा आढावा घेतला. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, शिघ्र कृती दलाचे पथक यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैणात करण्यात आले होते. मिरवणुका रेंगाळत राहू नये म्हणून विशेष दक्षता देखील घेण्यात येत होती. 
 

Web Title: Immersion procession in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.