शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

माध्यमिक विद्यालय, तोरखेडा तोरखेडा, ता.शहादा येथील सु.भ. कदमबांडे माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.टी. पाटील ...

माध्यमिक विद्यालय, तोरखेडा

तोरखेडा, ता.शहादा येथील सु.भ. कदमबांडे माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.टी. पाटील होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी व्याख्याते प्रा.एस.ए. पाटील, उपशिक्षक वाय.एम. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन आर.पी. केसेकर तर आभार एन.एन. बावा यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत, वडाळी

वडाळी, ता.शहादा येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच जामसिंग भिल, उपसरपंच हिंमत सोनवणे, पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी, माजी ग्रा.पं. सदस्य दगा नाईक, चंद्रकांत रायसिंग, माजी ग्रा.पं. सदस्य तात्या बैसाणे, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी उत्तम माळी, नाना गोसावी, संदीप माळी आदी उपस्थित होते.

भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, वडाळी

वडाळी, ता.शहादा येथील ग्रामीण बहुउद्देशीय विद्याप्रसारक मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या फलकाचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नवनाथ सेवाभावी मंडळाचे सचिव महेंद्रनाथ जगताप, ग्रामीण बहुउद्देशीय विद्याप्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य चंद्रकांत रायसिंग, अनिल चौधरी, युवक दीपक माळी, चंद्रकांत सोनवणे, संदीप कंखरे, नितिन पाटील, अमित गोसावी, पंकज पवार आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले न.पा. शाळा क्रमांक चार,नंदुरबार

नंदुरबार येथील सावित्रीबाई फुले नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक चारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दासू कोकणी हे होते. त्यांनी प्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तद्नंतर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांनी कौतुक केले. या वेळी शिक्षक शिरीष पवार, अर्चना गावीत, दासू कोकणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन निशा सोनवणे तर आभार शिरीष पवार यांनी मानले.