डॉ.बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाउंडेशनतर्फे प्रतिमा पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST2021-02-20T05:32:25+5:302021-02-20T05:32:25+5:30

काणे विद्यामंदिर नंदुरबार नंदुरबार शहरातील काणे विद्या मंदिरात शिवजयंतीनिमित्त ऑनलाइन फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुलभा महिरे ...

Image Worship by Dr. Babasaheb Ambedkar Cultural Foundation | डॉ.बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाउंडेशनतर्फे प्रतिमा पूजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाउंडेशनतर्फे प्रतिमा पूजन

काणे विद्यामंदिर नंदुरबार

नंदुरबार शहरातील काणे विद्या मंदिरात शिवजयंतीनिमित्त ऑनलाइन फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुलभा महिरे होत्या. प्रारंभी त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय नेत्यांवर फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतली. यात एकूण ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. कार्यक्रमास घ.रा.बेडसे, पुष्पा चौरे, अमित वसावे, प्रवीण परदेशी, अनिता पाठक, प्र.म. भामरे, न.ह. ब्रह्ममे, वृषाली पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन रेखा चौखरी यांनी केले.

भाजपतर्फे प्रतिमा पूजन, खांडबारा

खांडबारा, ता.नवापूर येथील महाराणा प्रताप चौक येथे शिवजयंतीनिमित्त भाजचे नवापूर तालुका चिटणीस वरुण गावीत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी चिटणीस अनिल शर्मा, विनोद परदेशी, राजेंद्र वाघ, कांतीलाल महाराज, मनीष परदेशी, राहुल वाडीले, भूपेद्र राजपूत, बिट्टु परदेशी आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत, खांडबारा

खांडबारा, ता.नवापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत समिती सदस्य शैलेश गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते पद्माकर शिंदे, ग्रामविकास अधिकारी विजय अहिरे, सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी विलास गव्हाणे, विकास रामराजे उपस्थित होते.

सर्वोदय विद्या मंदिर, प्रकाशा

प्रकाशा, ता.शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य ए.के. पटेल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी उपमुख्याध्यापक डी.टी. चौधरी, पर्यवेक्षिका पुष्पा पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी, सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, तहसीलदार उल्हास देवरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Image Worship by Dr. Babasaheb Ambedkar Cultural Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.