डोकारे येथे अवैध लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:37 IST2019-04-13T21:37:12+5:302019-04-13T21:37:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील नवापूर येथे सागवानी लाकूड जप्तीची कारवाई वनविभागाकडून करण्यात आली़ शनिवारी सकाळी 9 वाजता ...

डोकारे येथे अवैध लाकूड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील नवापूर येथे सागवानी लाकूड जप्तीची कारवाई वनविभागाकडून करण्यात आली़ शनिवारी सकाळी 9 वाजता वनविभागाच्या पथकाने चारचाकी वाहनाचा 25 किलोमीटर पाठलाग करुन ही कारवाई केली़ यात वाहनासह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
वनविभागाचे नंदुरबार आणि नवापूर येथील पथक शनिवारी पहाटे नवापूर तालुक्यातील कामोद आणि कोटखांब या गावांमध्य गस्त करत असताना कोटखांब येथे एमएच 08 सी 7358 या चारचाकी वाहनातून अवैैध साग लाकडांची तस्करी होत असल्याचे त्यांना दिसून आल़े दरम्यान वाहनचालकास वनविभागाचे पथक दिसून आल्यानंतर त्याने कामोद पाटीबेडकी, चिंचपाडा, डोकारे गावार्पयत अत्यंत वेगाने वाहन पळवल़े डोकारे येथे वाहन लावून संबधित चालक पसार झाला़ गस्तीपथकाने 3 लाख 70 हजार रुपये किमतीच्या वाहनासह 30 हजाराचे सागवानी लाकूड असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई उपविभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल प्रकाश मावची, डी.के.जाधव, वनरक्षक अरविंद निकम, विशाल शिरसाठ, साहेबराव तुंगार यांनी केली़ लाकडासह जप्त करण्यात आलेले वाहन वनविभागाच्या नवापूर आगारात जमा करण्यात आल़े याबाबत नवापूर वनक्षेत्रपाल यांच्याकडे वनगुन्हा दाखल करण्यात आला आह़े
डोकारे गावात सागाच्या लाकडाने भरलेले वाहन सोडून पळून गेलेल्या चालकाला संरक्षण देण्याचा प्रयत्न येथील काहींनी केल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यानुसार वनविभागाच्या पथकाकडून या भागात तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े