शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

अवैध लाकडासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर : वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील वावडी (सावरट) येथे एका वाहनातून अवैध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर : वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील वावडी (सावरट) येथे एका वाहनातून अवैध तोडीचे खैर व शिसम मिळून १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर व शहादा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील वावडी (सावरट) येथे जाऊन गावात संशयितरित्या उभे असलेला ट्रक (क्रमांक एम.एच.१९ झेड- ३७५३) या वाहनाची तपासणी केली असता त्यात ताज्या तोडीचा साल काढलेला खैर व शिसम चौपाट भरलेले आढळून आले. वन विभागाच्या पथकास पाहून  घटनास्थळावरून वाहन चालक फरार  झाला. घटनास्थळावर प्राप्त लाकूड अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे समजल्यावर वाहनासह लाकूड जप्त करून शासकीय विक्री आगार  नवापूर येथे जमा करण्यात आले. याबाबत वनक्षेत्रपाल नवापूर यांनी प्रथम         रिपोर्ट दिल्याने गुन्हा नोंद  केला        आहे. ही कारवाई खांडबारा वनक्षेत्रपाल व तेथील कर्मचारी,  वनक्षेत्रपाल फिरते पथक शहादा व तेथील कर्मचारी, वनक्षेत्रपाल          नवापूर व कर्मचारी यांनी केली. जप्त लाकूड माल व वाहनाची अंदाजे किंमत १३ लाख रुपये आहे. वनसंरक्षक वनवृत्त धुळे, उपवनसंरक्षक नंदुरबार, विभागीय दक्षता अधिकारी धुळे व सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रशांत हुमने, वनपाल पवार, डी.के. जाधव, वनरक्षक संजय बडगुजर, प्रशांत सोनवणे, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, सतीश पदमोर, नितीन पाटील, लक्ष्मण पवार, किसन वसावे हे पुढील तपास करीत आहेत.