शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

नवापुरात अपघातग्रस्त ट्रकमधून ५२ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील नाल्यात उलटलेल्या ट्रकमधील त्या अवैध दारुची किंमत तब्बल ५२ लाख रुपये निघाली. मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील नाल्यात उलटलेल्या ट्रकमधील त्या अवैध दारुची किंमत तब्बल ५२ लाख रुपये निघाली. मंगळवारी झालेल्या मोजदादीनंतर अवाक् करणारा हा आकडा बाहेर आला. ट्रकची किंमत मिळून नवापूर पोलिसांनी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.पोलीस सूत्रानुसार, १ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण हे गावात गस्त करीत असताना नयी होन्डा भागाकडे मालट्रक (क्रमांक जीजे-१८ - ९७९०) दिसून आला. त्यांना पाहून चालकाने सरळ सुरत रोडने न जाता शहरात गाडी वळविली. त्यामुळे उपनिरीक्षक नासीर पठाण यांना त्या वाहनाचा संशय आल्याने त्यांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता मालट्रकवरील चालक हा न थांबता शहराच्या दिशेने निघून आला. ही बाब उपनिरीक्षक नासीर पठाण यांनी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना सांगितल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, धिरज महाजन व सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुजरात राज्याकडे जाणाºया नारायणपूर रोडवर त्या ट्रकचा शोध घेण्यासाठी रवाना केले. मालट्रकवरील चालकाने पोलिसांना समोरुन येताना पाहिल्यावर ट्रक लपविण्याचा प्रयत्न केला व ट्रक पसार होऊ शकणार नाही अशा रस्त्यावर ट्रक नेला. त्याच प्रयत्नात ट्रक नाल्यात उलटला व चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी ट्रकची तपासणी करता त्यात विदेशी दारुचा ५२ लाख ६० हजार ८०० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा आढळून आला. १० लाख रुपये किंमतीचा मालट्रक व दारुसाठा असा एकूण ६२ लाख ६० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस ठाण्यात आणून दारुबंदी सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, दिगंबर शिंपी, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण यांच्यासह हे.कॉ.विकास पाटील, प्रवीण मोरे, महेश पवार, अल्ताफ शेख, आदिनाथ गोसावी, पंकज सूर्यवंशी व निशांत गिते या कर्मचाऱ्यांनी केली.