नवापुरात अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:45 IST2020-05-04T12:45:12+5:302020-05-04T12:45:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरात चारचाकी वाहनासह एकाच्या घरातून अवैध मद्य जप्त करण्याची कारवाई पोलीसांकडून करण्यात आली़ शनिवार ...

Illegal liquor stocks seized in Navapur | नवापुरात अवैध मद्यसाठा जप्त

नवापुरात अवैध मद्यसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : शहरात चारचाकी वाहनासह एकाच्या घरातून अवैध मद्य जप्त करण्याची कारवाई पोलीसांकडून करण्यात आली़ शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस पोलीस पथकाने ही कारवाई केली़
धुळयाकडून जीजे २६ ए ६४०० या वाहनातून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार शहरातील शांतीदूत पोलीस चौकी भागात पोलीस नाईक प्रविण मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अदिनाथ गोसावी, जयेश बाविस्कर, पंकज सूर्यवंशी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता़ परंतू ही गाडी न थांबता सरळ शहरात गेली होती़ पोलीसांनी पाठलग करुन गाडी थांबवून झडती घेतली असता त्यातून ७० हजार रुपये किमतीची बियर आढळून आली़ गाडीसह हा एकूण ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला़
दरम्यान रविवारी दुपारी शहरातील दिनेश चौधरी याच्या घरात अवैध दारुचा साठा करुन करुन ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महाजन, सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पवार, पोलीस कॉन्स्टेबल तनपुरे, बविस्कर, सुरेखा वळवी यांच्या पथकाने तेथे छापा टाकला होता़ यावेळी घरातून ५५ हजार ९१४ रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले़ दोघांवर नवापुर पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांच्या पथकाने कारवाई केली़

Web Title: Illegal liquor stocks seized in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.