गौणखनिजाचा अवैधपणे उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:48 IST2020-08-29T12:48:31+5:302020-08-29T12:48:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागात गौणखनिज खदाणीत विनापरवाना खोदकाम करून चढ्या भावने गौणखनिजाची सर्रास विक्री सुरू ...

Illegal extraction of secondary minerals | गौणखनिजाचा अवैधपणे उपसा

गौणखनिजाचा अवैधपणे उपसा


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागात गौणखनिज खदाणीत विनापरवाना खोदकाम करून चढ्या भावने गौणखनिजाची सर्रास विक्री सुरू आहे. वरूळ कानडी परिसरात चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर टेकड्या फोडून गौणखनिजाची लूट होत आहे. प्रशासनातील कोणाच्या तरी सहकार्याशिवाय ही लूट होऊ शकत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गौणखनिजाच्या अवैध खोदाई व वाहतुकीमुळे शासनाचा करही बुडत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या खदाणीतून मोठ्या प्रमाणात डबर, खडी व मुरूमची अनधिकृत वाहतूक सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळातही ही वाहतूक सुरूच होती. खदाणीतून गौणखनिज काढण्यासाठी अनेक नियम असताना त्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून गौणखनिज माफियांकडून खोदाई व त्याची वाहतूक सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर खोदकाम झाल्याने तालुक्यातील अनेक टेकड्या नेस्तानाबूत झाल्या आहेत. महसूल विभागाचे अधिकारी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत ही वाहतूक सुरू आहे.
ठेकेदारांनी शासनाची कुठलीही परवानगी नसताना अनधिकृत खदाणी तयार केल्या आहेत. त्याठिकाणी पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत पोकलेन, जेसीबी मशीनद्वारे खोदकाम करण्यात येऊन डबर, मुरुमची वाहतूक करण्यात येते. वरूळ कानडी येथे मोठी टेकडी होती. मात्र गेल्या पाच-सहा वर्षापासून खदाणी तयार करून खडी, मुरूमची वाहतूक होत आहे. सुरुंग लावून दगड फोडला जातो. त्यामुळे परिसरातील गावातील नागरिकांना त्रासही होतो. याबाबत या नागरिकांनी तक्रारीदेखील केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने संपूर्ण टेकडी आजच्या स्थितीत भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. गौणखनिजाची अनधिकृत खोदाई रोखण्याचे प्रथम कर्तव्य मंडळ अधिकारी व तलाठी यांचे असताना त्यांचेही दुर्लक्ष होत आहे. आजपर्यंत एकाही मुरुम किंवा डबर वाहतूक करणाºया वाहनावर कारवाई झाली नसल्याचे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरुळ कानडीप्रमाणेच अनरद टेकडीजवळ कहाटूळ फाट्याजवळ, पुसनद शिवार, डोंगरगाव शिवार, राणीपूर शिवारातूनही टेकड्या फोडून गौणखनिजाची लूट सुरू आहे. त्यामुळे शासनाचा मोठा करही बुडत आहे.
४तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी याबाबत दखल घेऊन कोणकोणत्या भागात अनाधिकृत खदानी आहेत, कोणकोणत्या मंडळ अधिकाºयांच्या कार्यक्षेत्रात या खदाणी आहेत, त्यांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली, शासनाची किती रॉयल्टी वसूल केली याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आहे. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाºयांचे असेच दुर्लक्ष राहिले तर ठेकेदार व गौणखनिज माफिया ग्रामीण भागातील एकेक टेकड्या भुईसपाट करतील व त्या नामशेष होऊन पर्यावरणालाही धोका पोहोचू शकतो, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

गौणखनिजसंदर्भात नियमानुसार परवाने देण्यात येतात. त्याबाबत वेळोवेळी तपासणीही करण्यात आली आहे. मात्र जर नियमबाह्य वाहतूक व उत्खनन होत असेल तर त्यासंदर्भात तपासणी करून कारवाई करण्यासंदर्भात मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ.मिलिंद कुलकर्णी,
तहसीलदार, शहादा.

 

Web Title: Illegal extraction of secondary minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.