चाैफुलीवर खड्डे होऊनही दुर्लक्षच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:50+5:302021-08-24T04:34:50+5:30
जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली नंदुरबार : कोरोनानंतर जिल्हा रुग्णालयात कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर अपघात विभागासह ...

चाैफुलीवर खड्डे होऊनही दुर्लक्षच
जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली
नंदुरबार : कोरोनानंतर जिल्हा रुग्णालयात कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर अपघात विभागासह इतर विभागांचे कामकाज वेगात सुरू आहे. रुग्णालयाच्या प्रसूती विभागात नियमित कामकाज होत असल्याने मातांना दिलासा मिळत आहे. या ठिकाणी दिवसाला १० पेक्षा अधिक मातांची प्रसूती होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दाखल होणाऱ्या सर्व मातांना सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत.
समस्या निकाली काढण्याची मागणी
धडगाव : शहरातील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. यातून कचरा संकलनाला नगरपंचायतीचे कर्मचारी सातत्याने खो देत आहेत. या पार्श्वभूमीवर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निकाली काढून तातडीने शहरातील कचरा संकलन सुरळीत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात साठून असलेल्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
तळोदा तालुक्यात पुन्हा हिंस्र प्राणी
तळोदा : तालुक्यातील रांझणी, रोझवा या भागात पुन्हा बिबट्याचा संचार सुरू झाला आहे. सायंकाळी शेतशिवारात हे प्राणी संचार करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या या भागात शेतीकामे सुरू आहेत. पेरणी केलेल्या पिकांची मशागत करण्यासाठी शेतकरी मजुरांसह जात आहेत. मात्र हिंस्र प्राणी दिसून आल्यानंतर पळापळ होत आहे.