शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे लसीकरण सुरू झाल्यास रक्तबॅगांची वाढणार चणचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

नंदुरबार : १८ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची घोषणा करण्यात आल्याने येत्या काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने शासकीय रक्तपेढी ...

नंदुरबार : १८ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची घोषणा करण्यात आल्याने येत्या काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने शासकीय रक्तपेढी तसेच इतर विविध संघटनांतर्फे रक्तदानाला गेल्या काही दिवसांत वेग देण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये समाधानकारक रक्तसाठा आहे. याशिवाय सध्या कोरोनामुळे शस्त्रक्रियांचे प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे रक्ताची मागणीदेखील कमी झाली आहे.

लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा जाणवणार, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती; परंतु रक्तदान करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुणांचा अर्थात २० ते ४५ वर्षवयोगटांतील व्यक्तींचा सर्वाधिक सहभाग असतो. त्यामुळे लसीकरण सुरू होऊनही त्याचा फारसा परिणाम रक्तदान व रक्तपेढीतील रक्तसाठ्यावर झाला नव्हता; परंतु आता १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण करण्याचा निर्णय झाल्याने येत्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्यातरी समाधानकारक साठा

सध्यातरी शासकीय व खासगी रक्तपेढ्यांमध्ये समाधानकारक रक्तसाठा आहे. शासकीय रक्तपेढीत एकूण १६४ रक्तबॅगा शिल्लक आहेत. असे असले तरी सर्वच रक्तगटांतील निगेटिव्ह गटाच्या रक्तबॅगांची संख्या नसल्यासारखीच आहे. त्यामुळे निगेटिव्ह रक्तगटासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. त्यामुळे निगेटिव्ह रक्तगटाचा साठा देखील पुरेसा प्रमाणात करून ठेवणे गरजेचे आहे. खासगी रक्तपेढ्यांमध्ये देखील रक्तसाठा बऱ्यापैकी असला तरी निगेटिव्ह रक्तगटाची चणचण आहे.

युवकांना आवाहन

विविध रक्तदाता संघटना तसेच शासनातर्फेही युवकांना येत्या काळात रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे. एकदाचे १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाल्यास अशावेळी लस घेतलेल्या व्यक्तींना दोन महिने रक्तदान करता येणार नाहीत. ही बाब लक्षात घेता रक्तदान शिबिरांना ‘ब्रेक’ बसेल, रक्तदानासाठी कुणी पुढे येणार नाही त्यामुळे रक्ताची आणीबाणी होऊ शकते.