शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मोदीसाहेब मिठाई हवी असेल तर नंदुरबारला या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:59 PM

नंदुरबार : दिवाळीच्या दिवसात नवीन घर मिळाले आहे, मित्र परिवार आणि नातेवाईकांना मिठाई वाटली मग़़ माझंही तोंड गोड करा़़ ...

नंदुरबार : दिवाळीच्या दिवसात नवीन घर मिळाले आहे, मित्र परिवार आणि नातेवाईकांना मिठाई वाटली मग़़ माझंही तोंड गोड करा़़ ! या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दिलखुलास संवादातून आनंदाने गद्गद् झालेल्या सातपुडय़ातील सिंगा वसावे या घरकुल लाभार्थीने ‘मोदी साहेब मिठाई पाहिजे असेल तर नंदुरबारला या़!’ असे उत्तर देत प्रधानमंत्र्यांना आमंत्रण दिल़े शिर्डी येथील ई-गृहप्रवेश कार्यक्रमप्रसंगी व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंगच्या माध्यमातून हा संवाद घडून आला़जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हिडिओ कॉन्स्फरन्स हॉलमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सात लाभार्थीसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे संवाद साधत त्यांच्या घरकुलाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेत त्यांना ई-गृहप्रवेश करून दिला़ शिर्डी येथून राज्याच्या विविध भागातील घरकुल लाभार्थीसोबत प्रधानमंत्री मोदी चर्चा करत होत़े जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून नंदुरबार जिल्ह्यातील सात लाभार्थी यावेळी व्हीसीद्वारे प्रधानमंत्री मोदी यांच्यासोबत संपर्कात होत़े प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे हे लाभार्थीसह उपस्थित होत़े सकाळी 10 वाजेपासून या उपक्रमास प्रारंभ झाला होता़ प्रशासनाला चार दिवसांपूर्वी ई-गृहप्रवेश उपक्रमासाठी चार घरकुल लाभार्थीची निवड करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ यानुसार त्यांनी प्रारंभी भगदरी ता़ अक्कलकुवा येथील सिंगा सेगा वसावे, सायसिंग नूरज्या वसावे, वाटवी ता़ नवापूर येथील जयवंती मोतीलाल कोकणी, बिजगाव येथील श्रावण निंबा सोनवणे या चौघांची निवड केली होती़ परंतू काही कारणास्तव गुरुवारी यात नंदुरबार तालुक्यातील वाघशेपा गावाची निवड करून तेथील चार लाभार्थीना ऐनवेळी आमंत्रित करण्यात आल़े तर वाटवी येथील ग्रामपंचायत कार्यालयातच जयवंती कोकणी यांची व्यवस्था करण्यात आली़ हा संवाद सुरु झाल्यानंतर वाटवी ग्रामपंचायत ऑनलाईनच न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले सिंगा सेगा वसावे, सायसिंग वसावे दोघे रा़ भगदरी ता़ अक्कलकुवा, वाघशेपा ता़ नंदुरबार येथील अहिल्याबाई अशोक पाडवी, मंजूळाबाई संदेश पाडवी, जयवंतीबाई छगन गावीत, शेवंतीबाई दिवाण पाडवी, नलिनीबाई दिवाणजी गावीत यांच्यासोबत प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला़ या संवादादरम्यान उपस्थित लाभार्थीसोबत संपर्क करणा:या प्रधानमंत्री मोदी यांनी तिघा लाभार्थीची कौटूंबिक पाश्र्वभूमी जाणून घेत मुलींना शिकवता की, नाही अशीही विचारणा केली़ संवाद सुरु असताना सिंगा वसावे यांच्या आमंत्रणाला उत्तर देणा:या प्रधानमंत्री मोदी यांनी पुन्हा नंदुरबारच्या चौधरींच्या चायची आठवण काढत, नंदुरबार हा गुजरातचा पक्का शेजारी असल्याने येथेही गुजराती संस्कृती रूजली असल्याची भावना व्यक्त केली़