विविध शाळा, महाविद्यालयांत प्रतिमापूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST2021-08-12T04:34:44+5:302021-08-12T04:34:44+5:30
नंदुरबार शहरातील हि.गो. श्रॉफ हायस्कूलमध्ये विश्व आदिवासी दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश ...

विविध शाळा, महाविद्यालयांत प्रतिमापूजन
नंदुरबार शहरातील हि.गो. श्रॉफ हायस्कूलमध्ये विश्व आदिवासी दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, कैलास वळवी, वैभव पाटील, राहुल वडनेरे, हेमंत नरी आदींची उपस्थिती होती. जी.टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार
नंदुरबार शहरातील जी.टी. पाटील महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस. श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ. एम.जे. रघुवंशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन.जी. सोमाणी, उत्सव आणि जयंती समितीचे प्रमुख प्रा.डॉ. एस.बी. वायसे, तसेच समस्त प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डी.एम. सुपलेकर यांनी केले, तर आभार प्रा.डॉ. निशांत शेंडे यांनी मानले. याप्रसंगी कोविड नियमांचे पालन करण्यात आले.
जयहिंद प्रतिष्ठान, नंदुरबार
नंदुरबार शहरातील जयहिंद प्रतिष्ठान व व्ही.जी. ग्रुपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील जननायक वीर योद्धा बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास नंदुरबार विधानसभाचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत व आदिवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष अक्षय गवळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कृष्णा कुवर, प्रमोद कोकणी, बंटी अहिरे, गोपी कुवर, टीकाराम सूर्यवंशी, आदेश बागूल, पंकज गांगुर्डे, प्रमोद पवार, योगेश सूर्यवंशी, राहुल राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जागतिक आदिवासी तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील राणा प्रताप इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे होते. ज्येष्ठ शिक्षक बी.एस. कलाल, एस.सी. मराठे, पी.जी. ठाकरे, ए.एन. चौधरी, के.एल. सवाई, के.बी. वसावे शाळेचे वरिष्ठ लिपिक, राहुलदेव पाठक, हेमंत सूर्यवंशी (क. लिपिक) आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक वैशाली पाटील यांनी केले. बी.एस. कलाल, श्रीमती सरिता वसावे यांनी ऑगस्ट क्रांतीचे महत्त्व सांगून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश शासनाला हादरवून सोडणाऱ्या क्रांतिवीर बिरासा मुंडा, वीर खाज्या नाईक, वीर तंट्या भिल्ल यांच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणातून एच.पी. मगरे यांनी ‘भारतीय स्वातंत्र्यलढा व आदिवासी समाजाचे बलिदान’ यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील ‘रावलापानी’ येथील गोळीबार झालेल्या ऐतिहासिक घटनेचा प्रामुख्याने उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल कुमार सवाई यांनी केले.