आयएमए डॉक्टरांनी केले काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:27 IST2019-06-15T12:26:25+5:302019-06-15T12:27:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली काळ्या फिती ...

आयएमए डॉक्टरांनी केले काळ्या फिती लावून काम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली काळ्या फिती लावून काम केले. शिवाय अपर जिल्हाधिका:यांना निवेदन दिले.
डॉक्टरांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे. डॉक्टरांना संरक्षण देण्याची व कडक कायदे करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. कोलकाता येथे झालेला प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकाराचा इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे निषेध करण्यात येत आहे. या निषेधार्थ शुक्रवारी सर्व डॉक्टरांनी काळा दिवस पाळत काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना निवेदन दिले.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश वळवी, सचिव डॉ.जय देसाई, खजिनदार डॉ.नागोटे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.